आजकाल मराठी तसेच हिंदी चित्रपटाचा ट्रेंड बदलताना दिसत आहे. मारणारी, प्रेम, विवाह या पलीकडे जाऊन आता भूतकाळातील कहाणी दाखवली जाते. अनेक थोर लोकांच्या जीवन कथा पडद्यावर दाखवून त्यांचे जीवन चरित्र प्रेक्षकांसमोर मांडले जाते. मराठीमध्ये अनेक असे चित्रपट आणि मालिका बनल्या आहेत. यातच मागील अनेक दिवसांपासून एक नाव सातत्याने कानावर पडत आहे, ते ‘पावनखिंड’ या चित्रपटाचे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासून सगळ्यांना हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याची वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
नुकतेच ‘पावनखिंड’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून प्रत्येक मराठ्यामधील रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. ट्रेलरमध्ये चित्रपटातील सगळ्या स्टारकास्टची ओळख होते. चित्रपटात मृणाल कुलकर्णी, दीप्ती केळकर, सुरभी भावे, चिन्मय मांडलेकर, प्राजक्ता माळी, माधवी निमकर हे कलाकार दिसत आहे. ट्रेलर पाहून हा चित्रपट काहीतरी नवीन इतिहास रुचणार आहे, अशी सगळेजण आशा व्यक्त करत आहेत. (pawankhind movie trailer released)
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची कहाणी लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत, शत्रूची वाट रोखून ठेवून पराक्रम केला होता. त्यातच ते धारातीर्थी पडले होते. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्ताने पावन झालेल्या या खिंडीला पुढे ‘पावनखिंड’ हे नाव पडले. ही संपूर्ण विस्तृत कहाणी या चित्रपटातून आपल्याला पाहण्यास मिळणार आहे.
ए.ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरुद्ध आरेकर यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता सगळेजण हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.
हेही वाचा :
वाढदिवस विशेष : चित्रपट फ्लॉप होणार इकबाल खानने गाजवले टेलिव्हिजन, जाणून घेऊया खास माहिती
‘श्रीवल्ल्ली’ गाण्याचा परदेशातही गाजावाजा, इंग्रजी व्हर्जन आले प्रेक्षकांच्या भेटीला