कंगना रणौतचा शो लॉकअप सध्या चांगलंच चर्चेमध्ये आहे. स्पर्धकांच्या विविध खुलाशांमुळे या शोला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. मुनव्वर फारूकी याच्या मोठ्या खुलाशानंतर अभिनेत्री, मॉडेल पायल रोहतगीने तिच्या संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. तिचा खुलासा ऐकून तिथे असणारा प्रत्येक व्यक्ती भावुक झाली. पायल रोहतगीने सांगितले की, ती कधीच आई होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या शोमध्ये वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठा आणि क्लेशदायक खुलासा ऐकून सर्वच चक्रावून गेले.
लॉकअप शोमध्ये एक स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून पायल समोर आली आहे. खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात खूप जास्त चढ उतार पाहिले आहे. तिने शोमध्ये कॅमेऱ्यांसमोर सांगितले की, “मी आयव्हीएफ देखील केले होते. मात्र ते अयशस्वी झाले. मी कधीच आई होऊ शकत नाही, आणि यासाठीच मी संग्रामसोबत एवढे वर्ष लग्न केले नाही.”
Payal Rohatgi expressed that she can't produce a child and gave a message to the ladies out there ???? ❤️
Hats off to @Sangram_Sanjeet who has been so supportive to her .#PayalRohatgi #LockUpp— Lock UPP Updates (@LockUPPFeed) April 27, 2022
पुढे तिने सांगितले की ती आणि संग्राम यांनी आईवडील होण्यासाठी खूप प्रयत्न केले. ती आई होऊ शकत नाही. तिचे स्वतःचे मुलं कधी होऊ शकणार नाही. त्यांनी दोघांनी विचार केला होता की, आधी पायल प्रेग्नेंट झाली तर ते लग्न करतील. पायल म्हणाली, “मला याचसाठी फिजिकली आणि मेंटली फिट व्हायचे आहे. अभिनय करायचा आहे. याच आयुष्यासोबत बराच लांब प्रवास देखील करायचा आहे. आम्ही ४/५ वर्षांपासून यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र यशच मिळत नाही. आतापर्यन्त त्याला देखील समजले असेल की मी आई होऊ शकत नाही. मी संग्रामला सांगितले की, दुसऱ्या मुलीसोबत लग्न कर जी तुला मुलं देऊ शकतील.”
पुढे पायलने इतर मुलींना सल्ला देताना सांगितले की, “यासाठीच मी सर्वांना सांगते की, ज्या मुली आता २० मध्ये आहेत त्यांनी त्यांचे एग आताच फ्रिज करून ठेवा. जेणेकरून त्या ३०/४० मध्ये कधीपण सहज कन्सिव करू शकतील. त्यांना माझ्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.”
पायलच्या या खुलाशानंतर संग्रामने सांगितले की, “मी आणि पायल एकमेकांना १२ वर्षांपासून ओळखतो. ती खूपच स्ट्रॉंग महिला आहे. आम्ही आमच्या आयुष्यात अनेक उतार चढाव पाहिले. मी तिच्याकडून खूप काही शिकलो. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. कोणतीही परिस्थिती असली तरी मी तिच्यासोबत असेल. आम्ही आमच्या प्रेमाने सर्व कमतरता भरून काढू. ” तत्पूर्वी पायल आणि संग्राम एकमेकांना २०१२ पासून डेट करत असून, लवकरच ते लग्न देखील करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-