अटकेनंतर अहमदाबाद पोलिसांवर भडकली पायल रोहतगी; व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांवर साधला निशाणा


नेहमी आपल्या बेताल व्यक्तव्यांनी आणि वादांनी सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजे पायल रोहतगी. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी पायल मागच्या काही काळापासून मीडियामध्ये खूपच चर्चेत आली आहे. मागच्या महिन्यात पायलला अहमदाबादच्या पोलिसांनी अटक केली होती. पायलवर सोसायटीच्या चेयरमनला शिवीगाळ केल्याचा आणि जिवेमारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. पायलला अटक झाल्यानंतर जामिनावर तिची सुटका देखील झाली.

मात्र बाहेर आल्यानंतर पाययलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने अहमदाबादच्या पोलिसांवर निशाणा साधला होता. मात्र पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तिने हा व्हिडिओ डिलीट केला आहे. पायलने तिच्या व्हिडिओमध्ये पोलिसांना तिची माफी मागण्यास सांगत, तिच्या बिल्डिंगमध्ये असलेले सीसीटीव्ही तिला निर्दोष सिद्ध करतील असेही ती म्हणाली.

या व्हिडिओमध्ये पायल म्हणते, “मी स्पष्टपणे अहमदाबादच्या पोलिसांना सांगू इच्छिते की, २५ जून रोजी सकाळी माझ्या घरातून मला अटक करण्याचा तुमचा व्यवहार अतिशय चुकीचा होता. तुमचा या सर्व कृतीतून माझा अपमान करण्याचा उद्देश होता. पोलीस दलात असणाऱ्या तुम्हाला तुमच्या अशा कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे. मला माझे मुद्दे आणि माझा निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी कोणत्याही साक्षीदाराची गरज नाही. करण माझ्या सोसायटीमध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरेच मला निर्दोष सिद्ध करतील.” मात्र तिचा हा व्हिडिओ पुढच्या काही वेळातच डिलीट करण्यात आला.

पायलचे इंस्टाग्राम अकाऊंट तिची टीम हाताळते. तिच्या टीमने हा व्हिडिओ डिलीट करण्यामागचे कारण देताना सांगितले आहे की, “हा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी आमच्या वकिलांनी सांगितले होते. सोबतच डिलीट केलेले व्हिडिओ, व्हाट्सअँप चॅट आजच्या काळात पुन्हा मिळवता येते. तर या आणि पायल रोहतगीला न्याय मिळण्याची वाट पहा.”

तत्पूर्वी, चेयरमनने तिच्या विरोधात तक्रार दाखल करत तक्रारीत म्हटले होते की, “२० जून रोजी सोसायटीची मिटिंग सुरु होती. या मीटिंगमध्ये पायलने सोसायटीची सदस्य नसूनही हजेरी लावत चेयरमनला शिवीगाळ करत, लहान मुलांच्या सोसायटीमध्ये खेळण्यावरून तिने सर्वांशी भांडण केले.”

पायलची ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा तिला अटक झाली आहे. याआधी देखील २०१९ साली तिने नेहरू आणि गांधी यांच्या कुटुंबाबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. मुंबई पोलिसांनी तिचे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक देखील केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.