स्मिता गोंदकरने शेअर केले पारंपारिक लूकमधील फोटो; पाहायला मिळाला अभिनेत्रीचा मराठमोळा साज


‘पप्पी दे पारूला’ म्हणत एका चेहऱ्याने लाखो हृदय चोरले. तो चेहरा म्हणजेच अभिनेत्री स्मिता गोंदकर. तिचे हे गाणे प्रचंड हिट ठरले. शिवाय या अल्बम गाण्याने तिला तूफान लोकप्रियताही मिळवून दिली. आजही प्रेक्षक जेव्हा हे गाणे ऐकत असतील तर नक्कीच स्मिताचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येत असणार. या दिवसात अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे बरीच चर्चेत येत असते.

नुकतेच स्मिताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत. या फोटोमध्ये स्मिताचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळाला आहे. फोटोत तिने केशरी रंगाची साडी आणि गडद लाल रंगाचे ब्लाउज परिधान केले आहे. सोबतच घातलेले जड दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. एकंदरीत अशा लूकमध्ये स्मिता कमालीची सुंदर दिसत आहे.

अनेकदा बोल्ड अवतारात दिसणाऱ्या स्मिताला पारंपारिक अंदाजात पाहून, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. ती खूप सुंदर दिसत आहे, असे चाहते तिला कमेंट्सच्या माध्यमातून सांगत आहेत. बघता बघताच फोटोवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे. (smita gondkar shared photos in traditional look see here)

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. शिवाय तिचे अल्बम सॉंग सतत रिलीझ होत असतात. स्मिता मराठी बिगबॉसच्या दोन्ही सीझनमध्ये झळकली आहे. तसेच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. याठिकाणी तिचे ५ लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. जे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.