Tuesday, July 9, 2024

‘ट्रेंडिंग गर्ल’च्या किलर परफॉर्मन्सने घातला धुमाकूळ, अभिनेत्रीच्या अदांवर समर सिंगही झाला फिदा

‘देसी स्टार’ समर सिंग आणि ‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलम गिरी यांची जोडी जेव्हा जेव्हा एकत्र येते, तेव्हा ते प्रेक्षकांचे भान हरपते. ही एक हिट जोडी आहे. त्यांचे कोणतेही गाणे काही तासांत मिलियन व्ह्यूजच्या क्लबमध्ये सामील होते. आतापर्यंत अनेकदा कलाकार जोडीच्या गाण्यांनी यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच या जोडीचे एक नवीन गाणे प्रदर्शित केले आहे, जे यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

समर आणि नीलम यांच्यावर चित्रीत केलेल्या नवीन व्हिडिओ गाण्याचे बोल ‘पेन्ही जब लाले लाल साडीया हो’ असे आहेत.

वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) ‘पेन्ही जब लाले लाल साडीया हो’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. समरने या गाण्याला आवाज दिला असून, अभिनयही त्यानेच केला आहे. व्हिडिओमध्ये, लाल साडी आणि भांगेत सिंदूर भरलेली नीलम चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत, तर समर कुर्ता आणि पायजामासह लाल रंगाचा स्टोल परिधान करताना दिसत आहेत. काही तासांतच ९ लाखांहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे.

या लेटेस्ट म्युझिक अल्बममधील नीलम गिरीच्या किलर परफॉर्मन्सने प्रेक्षकांना पुन्हा एकदा वेड लावले आहे. व्हिडिओमध्ये तिने आपल्या लवचिक कंबरेने सर्वांना तिच्याकडे पाहण्यास भाग पाडले आहे. युट्यूबवर या गाण्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यावर चाहत्यांच्या भरघोस प्रतिक्रिया येत आहेत. यावरून या खास जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना इम्प्रेस केल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचवेळी, त्याचे चित्रीकरण मेगा बजेटसह झाले आहे. ‘पेन्ही जब लाले लाल साडीया हो’चे गीत हरिंद्र हरियाली यांनी लिहिले असून, संगीत एडीआर आनंद यांनी दिले आहे. याचे व्हिडिओ दिग्दर्शक भोजपुरिया, कोरिओग्राफर राहुल यादव, एडिटर मीत जी, प्रोडक्शन हेड पंकज सोनी आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-याला म्हणतात खरी प्रतिभा! नोरा फतेहीच्या ‘कुसू-कुसू’ गाण्यावर ‘या’ मुलांनी केला धमाकेदार डान्स

-‘बाँब स्क्वाड’ डान्स ग्रूपच्या तीन मुलींनी ‘टिप टिप बरसा पानी’वर केला जबरदस्त डान्स, तुमचेही थिरकतील पाय

-भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने मिळवले आणखी एक घवघवीत यश

हे देखील वाचा