भूषण कुमारच्या टी सीरीजने प्रदर्शित केलेल्या हिमांश कोहली आणि हेली दारूवाला यांच्या ‘मेरी तरह’ या गाण्याला आतापर्यंत १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याच्या यशानंतर, माध्यमांशी केलेल्या खास संवादात, जेव्हा ‘बॅक टू बॅक’ हिट म्युझिकल व्हिडिओ देणार्या हिमांशला विचारण्यात आले की, तुम्हाला हे व्यासपीठ किती आवडते, तेव्हा तो म्हणाला की, “ही सर्व माझ्यासाठी माध्यमे आहेत, हा जगाचा दृष्टीकोन आहे, आम्ही एखादा कलाकार कास्ट करतो मग तो टेलिव्हिजन करत असेल. चित्रपटात काम करत असेल किंवा सोशल मीडियावर तुमचे मनोरंजन करत असेल.”
लोकांचा दृष्टिकोन आहे वेगळा
हिमांश (himansh kohali) पुढे म्हणतो की, “या गोष्टी जर बारकाईने समजून घेतल्या तर वास्तवात आपण सगळेच कलाकार आहोत. फक्त दृष्टिकोन वेगळा आहे. जर आपण म्युझिक व्हिडिओंबद्दल बोललो, तर हिमांश कोहलीला अभिनय देखील करावा लागतो आणि तो टेलिव्हिजन शो किंवा चित्रपटात त्याची मेहनत करताना १००% देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, म्युझिक व्हिडिओचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात एक मेलोडी असते, ज्यात संगीत आहे.”
हिमांशने संगीतमय चित्रपटातून केले पदार्पण
आपले म्हणणे मांडताना हिमांश कोहली म्हणाला की, गाणे आणि सरगममुळे आपण म्युझिक व्हिडिओचा आनंद घेऊ शकतो. एखादी गोष्ट ऐकून तुमची प्रतिक्रिया असेल, तर थोड सोप आहे. ही एक गोष्ट आहे जी मला संगीत व्हिडिओंबद्दल आवडते. या चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास एका संगीतमय चित्रपटापासून सुरू झाला. जे खूप प्रसिद्ध झाले. मला इंडस्ट्रीत नुकतीच १० वर्षे पूर्ण झाली आहेत. अलीकडेच आम्ही आमच्या पहिल्या ‘यारिया’ चित्रपटाला ८ वर्षे पूर्ण झाली.”
गाणी नेहमी राहतील आठवणीत
हिमांश म्हणतो की, “अनेक वर्षे येतात, वर्षे निघून जातात, पण ‘यारिया’ अजूनही त्याच्या गाण्यांसाठी लक्षात राहतो. कारण त्यात दाखवलेले सीन, क्षण सर्व तरुण त्याच्याशी जोडू शकतात. प्रत्येकजण आपले बालपण त्याच्याशी जोडू शकतो आणि संगीत हे सर्व जोडते. म्हणूनच म्युझिक किंवा म्युझिक व्हिडिओ नेहमीच स्पेशल असतील कारण मला माहित आहे की, येणाऱ्या काळात गाणी नक्कीच लक्षात राहतील आणि लोक त्यांच्या आयुष्यातील ४ ते ५ मिनिटे गाणे ऐकण्यासाठी देतात.”
हिमांश २०१८ साली शेवटचा चित्रपटांमध्ये दिसला होता आणि तेव्हापासून तो चित्रपटांपासून दूर आहे. तो गाण्यांमध्ये दिसत असतो. त्याने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे, आता त्याचे ‘मेरी तरह’ गाणे खूप हिट होत आहे. हे गाणे टी-सीरीजने संगीतबद्ध केले आहे आणि पायल देवने जुबिन नौटियालसोबत गायले आहे. गाण्यात हिमांश आणि हेली यांच्यात रोमँटिक सीन्स आहेत.
हेही वाचा :
- ‘या’ चित्रपटातील भूमिकेसाठी झाला होता प्रियांका चोप्राच्या नावाला जोरदार विरोध, मुलाखतीत अभिनेत्रीने केला खुलासा
- ‘ही माझी भाषा नाही,’ म्हणत तेजस्वी प्रकाशवर संतापली गौहर खान, घरात झाला मोठा वाद
- सिद्धार्थ मल्होत्राने वाढदिवसापूर्वी ऍक्शन चित्रपटाचे शूटिंग केले सुरू, ‘योधा’चे मुंबई शेड्यूल करणार पूर्ण