Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा ६२ वर्षीय काकांनाही चढला फिव्हर, म्हणाले ‘पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे…’

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना अभिनित ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अगदी वेड लावले आहे. साउथमध्ये या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला असून, हिंदी व्हर्जनमध्ये देखील या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले आहे. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक डायलॉग वापरून युजर्स व्हिडिओचा भडीमार करत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉग वापरून केवळ तरुणच नाही, तर ज्येष्ठ व्यक्ती देखील व्हिडिओ बनवत आहेत. नाशिकमधील रहिवासी असलेले ६२ वर्षीय विजय खरोटे नावाच्या काकांना देखील ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर चढला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील सर्वात लोकप्रिय ठरलेला डायलॉग “पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या? फ्लावर नही फायर है मैं.” या डायलॉगवरील काकांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमुळे काका सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत. चाहचे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत असून, याची जोरदार चर्चा रंगली आहे. हे काका कृषी उत्पन्न विभागाचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्याकडे काम करतात. हे काका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, ते सतत आपले वेगवेगळे व्हिडिओ बनवून चाहत्यांबरोबर शेअर करतात. त्याचबरोबर काकांचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. विजय खरोटे हे टिक- टॉकवर देखील त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत होते. त्यावेळी त्यांना टिक-टॉकवर १ मिलियन चाहते फॉलो करत होते.

सामंथाने पहिल्यांदा केला आयटम नंबर 

याशिवाय ‘पुष्पा द राइज’ चित्रपटातील गाण्यांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री समंथा प्रभूने ‘ओ अंटा वा मावा’ गाण्यावर परफॉर्म केला आहे. या गाण्यातील अभिनेत्रीच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. हे या चित्रपटाचे हिट गाणे आहे. या गाण्याच्या माध्यमातून समंथा पहिल्यांदाच आयटम नंबर करताना दिसली आहे. त्यासाठी तिने मोठी रक्कमही घेतली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा