×

एकूण १६ दिवसांनी घरी परतला अल्लू अर्जुन, वाट पाहत लाडक्या लेकीने ’असं’ केलं स्वागत

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) १६ दिवसांच्या शूटिंगनंतर घरी परतला. तेव्हा त्याच्या मुलांनी त्याचे अतिशय खास पद्धतीने स्वागत केले. अल्लूने मुलांनी बनवलेली अतिशय सुंदर रांगोळी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट पोस्टवर शेअर केली आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘वेलकम नाना’ असे फुलांनी लिहिलेले दिसत आहे आणि समोर त्याची छोटी मुलगी उभी असल्याचे दिसत आहे.

मुलीने ’असे’ काहीसे केले स्वागत
ही पोस्ट शेअर करत अल्लूने लिहिले की, “१६ दिवस बाहेर राहून जेव्हा मी परतलो तेव्हा माझे या खास पद्धतीने स्वागत करण्यात आले.” त्याच्या पोस्टला अल्पावधीत १३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते अल्लू अर्जुनच्या मुलांचे कौतुक करताना दिसले. एका युजरने लिहिले की, “तुमची मुले तुमच्यावर खूप प्रेम करतात.”

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

‘पुष्पा’ चित्रपट हिट ठरला ब्लॉकबस्टर
या पोस्टशिवाय अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. ज्यामध्ये त्याची मुलगी त्याला तमिळमध्ये काहीतरी बोलताना दिसत आहे. अल्लू अर्जुनच्या मुलीचे नाव अरहा आणि मुलाचे नाव अयान आहे. तसेच, अलीकडेच रिलीझ झालेला अभिनेत्याचा ‘पुष्पा’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. या चित्रपटाचे भारतातच नाही, तर परदेशातही कौतुक होत आहे.

मुलगी रुपेरी पडद्यावर पदार्पणासाठी सज्ज
अल्लू अर्जुनने २०११ मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले. दोघांना २ मुले आहेत. अल्लू आणि मुलगी अरहा लवकरच ‘शकुंतलम’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. अल्लू आणि त्याची मुलगी पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू देखील वयाच्या २ ऱ्या वर्षी पहिल्यांदा पडद्यावर दिसला होता. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विजेता’ या चित्रपटात तो दिसला होता. त्याचवेळी त्याने २००१ मध्ये ’डॅडी’ चित्रपटात कॅमिओ केला आणि त्यानंतर २००३ मध्ये ‘गंगोत्री’ चित्रपटात पदार्पण केले.

हेही वाचा :

Latest Post