बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री कॅटरिना कॅफ पुन्हा एकदा फाेन भूत या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या हाॅरर काॅमेडी चित्रपटात कॅटरिनासाेबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीने फाेन भूत याचित्रपटाच्या ट्रेलरच्या पहिले एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कॅटरिना अतरंगी अवतारात दिसत आहे.
कॅटरिना कॅफ(Katrina Kaif) हिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बघू शकता की, सिद्धांत चतुर्वेदी(Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर(Ishaan Khatter) मेकअप करताना दिसत आहे आणि त्याचवेळी त्यांची नजर दूर असलेल्या आपल्या काे- एक्ट्रेस वर पडते, ज्यानंतर ते कॅटरिनाला आपल्या साेबत घेऊन जातात. त्याच्या पुढच्याच क्षणी अभिनेत्री चुटकी वाजवून दाेघांची वाईट अवस्था करते. ज्याने ते दाेघ हैरान हाेतात. या अतरंगी व्हिडिओला शेअर करत तिने लिहिले, “फाेन भूतचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.”
View this post on Instagram
फाेन भूतचा ट्रेलर 10 ऑक्टाेबरला रिलीज हाेणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट 7 ऑक्टाेबरला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार हाेता मात्र, काही कारणास्तव चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट पाेसपाेन केली आहे. आता हा चित्रपट 4 नाेव्हेंबर 2022ला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. कॅटरिना कॅफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट निर्माता रितेश सिधवानी आणि फरहािन अख्तर यांच्या प्राेडक्शन हाउस एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली बनला आहे.
कॅटरिना कॅफच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर कॅटरिना ‘फाेन भूत’ व्यतिरिक्त टायगर फ्रेंचाइजीचा तिसरा भाग ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कॅटरिनासाेबत सलामान खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री पाकिस्तानी एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. जे की, सलमान खान राॅ एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त कॅरटरिना श्रीराम निर्देशक मॅरी क्रिसमस या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय सेतुपति मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीला शेवटच सूर्यवंशी या चित्रपटात बघितल्या गेले हाेते. या चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमारसाेबत मुख्य भूमिकेत दिसली हाेती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
हुमा कुरेशी बनली लठ्ठ महिला! आगामी चित्रपटांचा घेऊ शकता ‘या’ दिवशी आनंद
अल्पवयीन मुलाच्या खांद्यावर सोपवली सलमानला उडवण्याची जबाबदारी, पोलिसांचा खळबळजनक खुलासा