मंडळी सध्या नवीन वर्ष साजरं करण्यासाठी अनेक जण परदेशात फिरायला गेले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी हे यावर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मालदीव येथे गेले आहेत. नव्या वर्षाच्या सूर्योदय मालदीवसारख्या रम्य ठिकाणी पाहणं म्हणजे स्वर्गसुख! कदाचित हाच आनंद घेण्यासाठी बॉलिवूडचे बरेचसे सेलेब्ज मालदीवला गेले असावेत. याच बॉलिवूड कलाकारांमध्ये नव्या तरुण कलाकारांचा समावेश झाला. यात अभिनेता चंकी पांडेंची कन्या अनन्या हीचादेखील समावेश झाला आहे. अनन्या नववर्ष साजरं करण्यासाठी मालदीव येथे गेली आहे. तिने तिचे बिकिनीमधले काही हॉट फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. आपल्यालाही हे फोटोज पाहायला आवडतील ना! चला तर मंडळी सोबतच अनन्याच्या लहानशा करकीर्दीवरही नजर टाकूयात.
अनन्या पांडे हिचं नाव जरी ऐकलं तरी तिचा चेहरा अनेकांच्या डोळ्यासमोर येतात ते तिचे हॉट लुक्स आणि लाखो तरुणांना घायाळ करणाऱ्या तिच्या अदा… फक्त बावीस वर्षांची असणारी अनन्या सौंदर्यात एखाद्या अप्सरेलाही मागे टाकेल. सध्या ती नववर्षाच्या स्वागतासाठी मालदीव येथे गेली आहे तेथील तिचे काही हॉट फोटो आहेत ते आपण अगोदर पहा मग पुढच्या माहितीकडे वळूयात.
नुकताच २ ऑक्टोबर रोजी अनन्या आणि ईशान खट्टर यांचा खाली पिली हा सिनेमा सगळीकडे रिलीज झाला. भारतात मात्र चित्रपट गृह बंदच असल्याने हा सिनेमा झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. यासोबतच आता अनन्याचे पुढील काही फोटोज पाहुयात. ज्यात ती तिचा आवडता पदार्थ बर्गर खाताना दिसत आहे.
अनन्याने २०१९ मध्ये स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याच वर्षी तिचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला तो म्हणजे कार्तिक आर्यन स्टारर पती पत्नी और वो! तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.