Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड चित्रपटात येण्यासाठी बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी सोडलंय अर्ध्यातूनच शिक्षण; ‘खिलाडी’ अक्षय कुमारचाही आहे समावेश

चित्रपटात येण्यासाठी बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी सोडलंय अर्ध्यातूनच शिक्षण; ‘खिलाडी’ अक्षय कुमारचाही आहे समावेश

आपल्या आवडत्या कलाकाराचे वैयक्तिक आयुष्य कसे असते, याबद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. ते काय खातात, काय पितात, कसे जगतात, एवढेच नव्हे तर ते किती सुशिक्षित आहेत, हेही चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, परिणीती चोप्रा, शाहरुख खान हे असे काही कलाकार आहेत, ज्यांनी आधी आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिले आणि नंतर चित्रपट जगताकडे वाटचाल केली. पण असे काही कलाकार आहेत, ज्यांना चित्रपटांची आणि मॉडेलिंगची चमकधमक बॉलिवूडपर्यंत घेऊन आली. तर आज जाणून घेऊया, काही बॉलिवूड कलाकारांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल.

कॅटरिना कैफ
माध्यमातील वृत्तानुसार, कॅटरिना कैफने फक्त हायस्कूलपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. कॅटरिनाने अगदी लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली, ज्यामुळे तिला खूप लवकर तिचे शिक्षण सोडून द्यावे लागले.

आमिर खान
आमिर खानला बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत बॉलिवूडमध्ये आमिर खानचे अनेक मोठे चित्रपट रिलीझ झाले आहेत आणि प्रत्येकजण त्याच्या अभिनयाचा चाहता आहे. परंतु त्याच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले, तर आमिरने नारसी मुंजे कॉलेजमधून फक्त बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

https://www.instagram.com/p/CMgdwsVMoCm/?utm_source=ig_web_copy_link

अक्षय कुमार
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमारने पदवीसाठी खालसा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पण बँकॉकमध्ये मार्शल आर्ट शिकण्यासाठी त्याने शिक्षण सोडले. आज अक्षयचा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीमध्ये समावेश आहे.

दीपिका पदुकोण
अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहे. मॉडेलिंगची ऑफर मिळताच दीपिकाने आपले पदवीचे शिक्षण मधेच सोडून दिले होते.

करीना कपूर
वयाच्या 20 व्या वर्षीच करीना कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. करीनाने चित्रपटांसाठी तिचे पदवीचे शिक्षण सोडले होते.

काजोल
काजोलने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आजही ती बॉलिवूडमध्ये पूर्णतः सक्रिय आहे. अलीकडेच काजोल ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ चित्रपटात दिसली होती. वयाच्या 17 व्या वर्षी काजोलने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, ज्यामुळे तिला तिचे शिक्षण मधूनच सोडावे लागले होते.

करिश्मा कपूर
माध्यमांतील वृत्तानुसार, करिश्मा कपूर वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपटात आली होती. यामुळेच तिचे शिक्षण अपूर्ण राहिले.

सलमान खान
‘भाईजान’ सलमान खानबद्दलही अशीच बातमी आली होती की, त्याला पदवीसाठी प्रवेश मिळाला होता. पण काही कारणांमुळे त्याने त्याचे शिक्षण मधूनच सोडले.

आज सलमान खानची गणना बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शोमॅन’ राज कपूरपासून ते ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमारपर्यंत ‘हे’ अभिनेते जन्मलेत पाकिस्तानात, बॉलिवूडमध्ये वाजवलाय आपल्या नावाचा डंका

-‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी आपल्याच वहिनी आणि मेव्हणीसोबत केला होता रोमान्स, आजही हिट आहेत रोमँटिक सीन्स

-‘लाखो दिलों की धडकन!’ रश्मिका मंदानाच्या आयुष्यातील ‘ते’ सत्य, जे कोणालाही माहित नाही; सुंदर हास्यामागे आहेत बऱ्याच वेदना

हे देखील वाचा