Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी आपल्याच वहिनी आणि मेव्हणीसोबत केला होता रोमान्स, आजही हिट आहेत रोमँटिक सीन्स

‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी आपल्याच वहिनी आणि मेव्हणीसोबत केला होता रोमान्स, आजही हिट आहेत रोमँटिक सीन्स

बॉलिवूडमधील चित्रपटात काम करताना अनेक कलाकारांचे एकमेकांशी खूप चांगले बॉंडिंगही पाहायला मिळते. त्यांनी ऑनस्क्रीन रोमान्स देखील केला आहे. पण नंतर वैयक्तिक आयुष्यात ते नातेवाईक झाले. बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या होणाऱ्या वहिनी आणि मेव्हणीसोबत एकत्र चित्रपटात कामच नाही, तर रोमान्स देखील केला आहे. चला तर मग जाऊन घेऊया अशा काही कलाकारांबद्दल…

अशोक कुमार आणि मधुबाला
अभिनेता अशोक कुमार आणि मधुबाला यांनी ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्या दोघांनी या चित्रपटात अनेक रोमँटिक सीन दिले होते. या जोडीला ऑनस्क्रीन खूप प्रेम मिळाले. नंतर मधुबाला हिने अशोक कुमार यांचा भाऊ किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. त्यामुळे मधुबाला या अशोक कुमार यांच्या वहिनी झाल्या.

https://youtu.be/VeimBD6V314

रणधीर कपूर आणि नीतू कपूर
रणधीर कपूर आणि नीतू कपूर यांनी जवळपास 5 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी कधी या गोष्टीचा‌ विचार देखील केला नसेल की, वैयक्तिक आयुष्यात ते एकमेकांचे वहिनी आणि दीर होतील. नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्याशी लग्न केले होते. त्यांनी ‘हीरालाल’, ‘पन्नालाल’, ‘कसमे वादा’, ‘भला मानूस’ और ‘ढोंगी’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

अनिल कपूर आणि श्रीदेवी
सुपरस्टार अनिल कपूर आणि श्रीदेवी ही बॉलिवूड मधील प्रसिद्ध जोडींपैकी एक होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. श्रीदेवीने अनिल कपूरचे भाऊ बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते. अशाप्रकारे वैयक्तिक आयुष्यात श्रीदेवी ही अनिल कपूर यांची वहिनी बनली. त्यांनी ‘जुदाई’, ‘लाडला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘लम्हे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

अजय देवगण आणि राणी मुखर्जी
अजय देवगण आणि राणी मुखर्जी यांनी दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. वैयक्तिक आयुष्यात राणी मुखर्जी ही अजय देवगणची मेव्हणी आहे. राणी मुखर्जी आणि काजोल या चुलत बहिणी आहेत.

सैफ अली खान आणि करिश्मा कपूर
सैफ अली खान आणि करिश्मा कपूर यांनी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या दोघांचे आंबट गोड नाते सगळ्यांनाच आवडले होते. प्रेक्षकांनी त्यांच्या जोडीला पसंती दर्शवली होती.

करिश्मा कपूर ही वैयक्तिक आयुष्यात करीना कपूर हिची बहीण आहे. त्यामुळे नात्याने करिश्मा ही सैफ अली खानची मेव्हणी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहापासून ते नताशापर्यंत लग्नाच्या ९ महिन्यांपूर्वीच आई बनणाऱ्या अभिनेत्री, मलायकाच्या बहिणीचाही समावेश

-‘लाखो दिलों की धडकन!’ रश्मिका मंदानाच्या आयुष्यातील ‘ते’ सत्य, जे कोणालाही माहित नाही; सुंदर हास्यामागे आहेत बऱ्याच वेदना

-‘कर्नाटक क्वीन’ ते ‘नॅशनल क्रश’ असा होता रश्मिका मंदानाचा सिनेसृष्टीतील प्रवास

हे देखील वाचा