‘या’ दिवशी ‘जून’च्या प्रदर्शनासोबतच सुरू होणार पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’चा प्रवास


प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी भर घालण्यासाठी अलीकडेच ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसंपासून याची चर्चा चालू आहे. आगामी मराठी सिनेमा ‘जून’च्या रिलीझ सोबतच या प्लॅटफॉर्मच्या प्रवासाची सुरुवात होईल. यामुळे चित्रपटाची रिलीझ डेट आणि प्लॅटफॉर्मचे लाँचिंग एकाच दिवशी म्हणजे ३० जून रोजी आयोजित करण्यात आले आहे.

हा चित्रपट मागच्या वर्षी म्हणजेच जून २०२० मध्येच रिलीझ करण्यात येणार होता. मात्र कोरोनानेमुळे इतर क्षेत्रांप्रमाणे चित्रपटसृष्टीही ठप्प झाली होती. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी डिजिटल रिलीझ हा एकमात्र पर्याय उपलब्ध होता.

नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवाकर अशा नामांकित कलाकारांमुळे ‘जून’ हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाची कथा प्रशंसित दिग्दर्शक निखिल महाजनने लिहिली आहे. ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जून’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘जून’च्या निमित्ताने निखिल महाजन निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. तसेच या चित्रपटाचे सर्व शूटिंग औरंगाबादमध्ये पार पडले आहे.

‘जून’ ही अशा दोन अपूर्ण व्यक्तींची कहाणी आहे, जी जीवनातल्या आव्हानांचा सामना करत असताना एकमेकांना सांत्वन देतात. ५१ व्या इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडिया)मध्ये इंडियन पॅनोरोमा या विभागात ‘जून’ चित्रपटाची निवड झाली होती. यासह पुणे फिल्म फेस्टिवल, केरळ फिल्म फेस्टिवल आणि त्यानंतर न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष

-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.