Saturday, July 6, 2024

अक्षयच्या आईच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी लिहिलं भलं मोठ्ठं पत्र; वाचून अभिनेताही झाला भावुक

अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यामागील काही दिवसांपासून आजारी होत्या. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. यादरम्यान तो शूटिंगसाठी युकेला होता. जेव्हा त्याला समजले की, आई आजारी आहे, तेव्हा तो मुंबईला परतला. आईच्या निधनानंतर सर्वांनी अक्षय कुमारचे सांत्वन केले. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अक्षय कुमारचे सांत्वन केले.

मोदी यांनी पत्र लिहित अक्षयच्या आईच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मोदी यांचे हे पत्र अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मोदी यांचे हे पत्र शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या सर्व शोक संदेशांबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. माननीय पंतप्रधानांच्या पत्राबद्दल मी खूप आभारी आहे. ज्यांनी माझ्या आईबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी वेळ काढला. हे सांत्वनपर शब्द नेहमी माझ्याबरोबर असतील, जय अंबे.”

मोदी यांनी अक्षय कुमारला शोक व्यक्त करणारे खूप मोठे पत्र लिहिले आहे. या शोक संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे की, “मला हे पत्र लिहावे लागले नसते, तर बरे झाले असते. एका आदर्श जगात अशी वेळ कधीही येऊ नये. तुमची आई अरुणा भाटियाजी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. त्या दिवशी जेव्हा सकाळी मी तुमच्याशी बोललो, तेव्हा तुम्ही खूप निराश होता. तुम्ही जेव्हा लिहिले, तेव्हा तुम्ही पूर्णपणे दुःखी होतात की, ‘ती माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग होती.’ आज मी देखील माझ्या बाजूने त्याच दुःखाच्या वेदना अनुभवण्यास सक्षम आहे.”

त्यांनी पुढे लिहिले की, “तुम्ही खूप मेहनत आणि संघर्षानंतर यशाची चव चाखली आहे. तुम्ही तुमच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर स्वतःचे नाव कमावले आहे. या प्रवासात, तुम्ही योग्य मूल्ये आणि नैतिक ताकद राखली आहे. जेणेकरून तुम्ही संकटांना संधींमध्ये बदलू शकाल आणि तुम्ही तुमच्या आई- वडिलांकडून हे शिकलात. जेव्हा तुम्ही तुमची कारकीर्द सुरू केली, तेव्हा मला खात्री आहे की, तुमच्या मार्गात येणाऱ्या लोकांना संशय आला असेल. परंतु तुमची आई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. यशाच्या उंचीपासून अपयशापर्यंत ती एक आधार म्हणून तुमच्यासोबत राहिली. आपण नेहमी नम्र आणि दयाळू राहा याची त्यांना खात्री केली. त्यांनी तुमच्यामध्ये सेवेची भावना देखील निर्माण केली, जी समाजासाठी तुमच्या परोपकारी कार्यात पुन्हा पुन्हा दिसली.”

आपला मुद्दा पुढे सांगताना मोदी यांनी लिहिले की, “आनंदाची गोष्ट आहे की, त्यांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्यात यशाची आणि स्टारडमची नवी उंची गाठताना पाहिले आहे. तुम्ही त्याच्यासाठी किती काळजी घेतली हे प्रेरणादायी आहे. त्यांचा लाडका मुलगा भारतातील सर्वात प्रिय आणि बहुमुखी अभिनेत्यांपैकी एक आहे. याची त्यांना जाणीव झाल्यामुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. अशा दुःखाच्या वेळी शब्द कमी पडतात. त्यांच्या आठवणी आणि वारसा जपून ठेवा. त्यांचा अभिमान वाढवा. या दुःखाच्या वेळी माझे विचार तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहेत.”

मोदी यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

हे देखील वाचा