Monday, March 23, 2026
Home बॉलीवूड अनुष्का अन् विराटच्या मुलीला धमकी देणाऱ्याला अटक, फरहान अख्तरने सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

अनुष्का अन् विराटच्या मुलीला धमकी देणाऱ्याला अटक, फरहान अख्तरने सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची मुलगी वामिकाला शारीरिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत होती. याच धमकी देणाऱ्या व्यक्तीला आता अटक करण्यात आली आहे. नुकतेच एका व्यक्तीने अनुष्काची मुलगी वामिकाला ऑनलाइन शारीरिक अत्याचाराची धमकी दिली होती. त्यावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचबरोबर फरहान अख्तरनेही या व्यक्तीच्या अटकेवर एक ट्वीट केले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, गुरुवारी (१० नोव्हेंबर) दुपारी पोलिसांनी हैदराबादमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक केली, जो सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे सांगितले जाते. धमकावल्याप्रकरणी अटक करून पोलिसांनी त्याला मुंबईत आणले आहे. विराटच्या मॅनेजरने याबाबत तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी कलम ३५४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आणि तत्काळ तपास सुरू केला.

या व्यक्तीच्या अटकेनंतर फरहान अख्तरने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. मात्र, त्याचवेळी महिला पत्रकारांना मिळणाऱ्या अशा धमक्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फरहान अख्तरने सोशल मीडियावर लिहिले की, “मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने मुलीला शारीरिक अत्याचाराची धमकी देणाऱ्या भोंदू व्यक्तीला शोधून अटक केल्याचे ऐकून मला खूप आनंद झाला.”

फरहान अख्तरने पुढे लिहिले आहे की, “ज्या महिला पत्रकारांना जवळपास रोजच अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात. त्यांच्यावर आता मला अशीच कारवाई अपेक्षित आहे.” अनुष्का शर्माची मुलगी वामिकाला धमकी दिल्याची बातमी समजल्यानंतर टीव्ही अभिनेता अभिनव शुक्लानेही ट्वीट करून संताप व्यक्त केला आहे. त्याने लिहिले की, “काही लोकांनी १० महिन्यांच्या मुलीला धमकावले आहे. लोक किती खालच्या पातळीवर गेले आहेत?”

पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीने विराट कोहलीची १० महिन्यांची मुलगी आणि मुंबईत घर असलेली अनुष्का शर्मा हिला लक्ष्य केले. दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून तपशीलवार कारवाईचा अहवाल मागवला होता. रामनागेश श्रीनिवास अकुबथिनी (२३) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा