Monday, June 24, 2024

‘मी भीत नाही…’ आक्षेपार्ह पोस्टरमुळे तक्रार दाखल झाल्यानंतर ‘काली’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिले ‘असे’ स्पष्टिकरण

सध्या डॉक्युमेंट्री फिल्ममेकर लीना मणिमेकलाई यांच्या  आगामी ‘काली’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यावर जोरदार  टीका होत आहे. पोस्टरमध्ये, हिंदू देवी काली सिगारेट ओढताना दिसत आहे आणि तिच्या हातात LGBTQ चे समर्थन करणारा ध्वज आहे. यानंतर लीनाविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे सध्या या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे. मात्र यामुळे निर्माती लीना मणिकमेककलाई यांना मात्र कारवाई करुनही काही फरक पडला नसल्याचे दिसत आहे. 

मदुराई, तामिळनाडू येथे जन्मलेल्या आणि टोरंटोमध्ये राहणाऱ्या लीना मनिमेकलाई यांनी शनिवारी ‘काली’ या शॉर्ट फिल्मचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर दिल्लीतील गौ महासभेचे अध्यक्ष अजय गौतम यांनी लीनाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. याला उत्तर देताना लीनानेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

लीनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, “माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही. जे निर्भयपणे बोलतात त्यांच्यासाठी मी नेहमीच उभी राहीन. जर माझ्या जीवाची किंमत असेल तर मी तेही देईन. लीनाने सांगितले होते की, तिचा हा चित्रपट टोरंटो येथील आगा खान म्युझियममधील ‘रिदम ऑफ कॅनडा’ या कार्यक्रमाचा एक भाग होता. लीनाला जेव्हा खूप टीकेला सामोरे जावे लागले तेव्हा तिने तिचे सोशल मीडिया अकाउंट खाजगी केले आणि कमेंटही बंद केल्या आहेत.

सोशल मीडियावर खूप विरोध झाल्यानंतर लीना मनिमेकलाई यांनी तमिळमध्ये ट्विट केले आणि लिहिले, ‘हा चित्रपट एका घटनेची कथा आहे ज्यामध्ये एका संध्याकाळी काली दिसते आणि टोरंटोच्या रस्त्यावर फिरतो. तुम्ही चित्र पाहिल्यास, तुम्ही मला अटक केलेल्या हॅशटॅगचे ट्विट शेअर करणार नाही, तर मला आवडते हॅशटॅगचे ट्विट शेअर करत आहात.’

लीनाचा जन्म मदुराई, तामिळनाडू येथे झाला. चित्रपट बनवण्याबरोबरच ती कविता लिहिते आणि अभिनयही करते. त्यांनी बहुतांशी माहितीपट बनवले आहेत जे अनेक परदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले गेले आहेत. लीनाने काही काळ मुख्य प्रवाहातील सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. यानंतर त्यांचा महात्मा हा पहिला माहितीपट प्रदर्शित झाला. यानंतर लीनाने दलित, महिला, ग्रामीण आणि LGBTQ समुदायाशी संबंधित समस्यांवर लघुपट आणि माहितीपट बनवले आहेत. लीना स्वतःला बाय-सेक्शुअल म्हणूनही सांगते. एक अभिनेत्री म्हणून लीनाने ‘चेलम्मा’, ‘लव्ह लॉस्ट’, ‘द व्हाईट कॅट’ आणि ‘सेंगदाल द डेड सी’ या चार लघुपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा