Monday, April 21, 2025
Home साऊथ सिनेमा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा द राईज’ चित्रपट जगभरात प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड करत लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. पुष्पा चित्रपटाच्या या यशामुळेच सुपरस्टार अल्लू  अर्जुनलाही देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पुष्पामधील दमदार अभिनयामुळे चर्चेत आलेल्या  अल्लू अर्जुनविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. ज्यामुळे अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या आहेत.  काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या  अल्लू अर्जुन एका कायदेशीर अडचणीत सापडला असून त्याच्यावर सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुनवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन विरुद्ध चुकीची जाहिरात केल्याप्रकरणी आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेविरुद्ध खोटी माहिती पसरवल्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अल्लू अर्जुन आणि शैक्षणिक संस्थेवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी विनंती कोठा उपेंद्र रेड्डी यांनी केली आहे.

तत्पुर्वी या जाहिरातीमध्ये अल्लू अर्जुनने श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेच्या एका जाहिरातीमध्ये आयआयटी आणि एनआयटीच्या रँकर्सची माहिती दिली होती.  ही जाहिरात दिशाभूल करणारी असून समाजाला चुकीची माहिती देत ​​असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच अभिनेता अल्लू अर्जुनवर सर्वत्र टिकाही होत आहे. या बातमीने अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा