प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने (दि, 24 डिसेंबर) रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्माहत्या केली. तुनिषा 20 ही वर्षाची असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्याशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केले होते. तिच्या आत्माहत्येनंतर अनेक गोष्टी उघडकीस होत आहेत. नुकत्याच दिलेल्या माहितीनुसर तुनिषाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.
‘अली बाब-दास्ता ए काबुल’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने गळफास घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले. तिच्या निधनांतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, तिने आत्माहत्या का केली असेल? त्याशिवाय तिच्या कोस्टारलाही अटक करण्यात आले आहे. मात्र, माध्यामातील वृत्तानुसार पोलीस सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्माहत्या केली, अशी माहिती समोर आली आहे. (Big revelation in suicide case Tunisha Sharma was pregnant?)
तुनिषाच्या कुटुंबियांनी तिचा को-स्टार शिझान खान (Shizan Khan) याच्यावर आरोप केला आहे. नुकतंच पोलिसांनी खुलासा आहे की, तुनिषाच्या शरीरावर कसल्याच प्रकारच्या जखमा आढळल्या नाहीत. गळफास घेतल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय ती गरोदर असल्याचेही खोडून टाकले आहे.
तुनिषाचा अली बाबा हा नवा शो काही काळापूर्वी सुरू झाला होता. या मालिकेबद्दल अभिनेत्री खूप उत्सुक होती. तिला विश्वास होता की, बऱ्याच काळानंतर ती पुन्हा एकदा टीव्हीवर एक पीरियड ड्रामा करत आहे, ज्यामध्ये ती अनेक चॅलेंजिंग लूक ट्राय करू शकते. तिच्या चाहत्यांनाही त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीची ही स्टाईल आवडली होती. मात्र, तिने आत्माहत्या केल्यानंतर अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (tv actress tunisha sharma commits suicide at the age of 20 actress hanged herself at her tv serial set ali baba dastaan e kabul)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तुनिषाच्या आत्म’हत्ये प्रकरणी उपस्थीत झाले ‘हे’ पाच प्रश्न, एकदा वाचाच
ब्रेंकिग! प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाविश्वावर शाेककळा