Sunday, April 14, 2024

तुनिषाच्या आत्म’हत्ये प्रकरणी उपस्थीत झाले ‘हे’ पाच प्रश्न, एकदा वाचाच

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्री तिच्या को-स्टारच्या मेकअप रूममध्ये मृतावस्थेत आढळून आली. तुनिषाच्या मृत्यूने अनेक प्रश्न मागे सोडले आहेत, ज्यांचे प्रश्न केवळ तिचे कुटुंबीय किंवा मित्रच नव्हे तर सर्वसामान्यांनाही जाणून घ्यायचे आहेत. तुनिषाच्या मृत्यूनंतर असे पाच प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांची उत्तरे प्रत्येकाला जाणून घ्यायची आहेत. अशा स्थितीत पोलिसांकडून या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील, अशी अपेक्षा आहे.

1. तुनिषाने तिच्या मृत्यूच्या काही तास आधी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये ती मेक-अप करताना दिसली होती. शेवटच्या व्हिडीओमध्ये तुनिषाची हेअर स्टाईल केल्या जात हाेती. अशा स्थितीत काही तासांत तुनिषाला एवढे मोठे पाऊल का उचलावे लागले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

2. तुनिषाच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी सेटवर उपस्थित असलेल्या युनिटमधील सर्व लोकांची चौकशी केली, ज्यामध्ये असे दिसून आले की, अभिनेत्रीने को-स्टार शीझान खानच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. शॉट दिल्यानंतर शीझान मेकअप रूममध्ये परतला तेव्हा दाराला कुलूप होते आणि दरवाजा तुटला तेव्हा तुनिशाला पाहून तो दंग झाला. अशा परिस्थितीत तुनिषाने शीजनची मेकअप रूमच का निवडली, असा प्रश्न उपस्थित होतो.

3. वयाच्या 20 व्या वर्षी तुनिषा ‘अली बाबा – दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होती. त्याचबरोबर तिने चित्रपटांमध्येही काम केले होते. करिअरच्या दृष्टीने ती तरुण वयात चांगली कामगिरी करत होती. मग तिने हा मार्ग का स्वीकारला?

4. पोलिसांनी तुनिषाबद्दल ज्या लोकांशी चर्चा केली, त्या सर्वांवरून कळले की ती खूप चांगल्या स्वभावाची मुलगी हाेती. सेटवरही ती नेहमीच मस्ती करत होती. मृत्यूच्या काही तास आधी तुनिषाने तिचा फोटोच नाही तर एक व्हिडिओही शेअर केला होता. मग काही तासांनंतरच तुनिषाने मृत्यूला का मिठी मारली?

5. तुनिषाने आत्महत्या करण्यासाठी शीजनची मेकअप रूम का निवडली? सेटवर शूटिंग सुरू होते, बरेच लोकही उपस्थित होते. अशा स्थितीत तुनिषाने आत्महत्या केल्याचे कोणी कसे पाहिले नाही?

असे विविध प्रश्न तुनिषाच्या आत्म’हत्यने निर्माण हाेत आहे. (tv actress tunisha sharma suicide case these five questions arose after the death of alibaba dastan e kabul actress)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतीय संघाच्या ‘दादा’ला वेड लावणारी नगमा, जिच्यावर फिदा होते 4 सुपरस्टार

ब्रेंकिग! प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाविश्वावर शाेककळा

हे देखील वाचा