सध्या अनेक सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. यापैकीच एक आहे प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा सिनेमा. या सिनेमाच्या निर्मात्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा राणी नंदिनीच्या रूपातील पहिला लूक जाहीर केला आहे. तसेच, ऐश्वर्याचा पहिला पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. राणी नंदिनीच्या रूपात ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे. ऐश्वर्याचा सिनेमातील लूक जाहीर होताच, सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. ती एकदम राणीप्रमाणे दिसत आहे. हा फोटो वेगान व्हायल होत आहे.
‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) या सिनेमाच्या पोस्टरमध्ये दिसते की, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने एक साडी परिधान केली आहे. तिच्या लूकला जाडसर दागिण्यांनी मढवले आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. निर्मात्यांनी ऐश्वर्याचा पहिला पोस्टर शेअर करत तिची ओळखही खास अंदाजात सांगितली आहे. हे सर्वकाही चाहत्यांना खूपच भावले आहे.
पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिले की, “सूड एक सुंदर चेहरा आहे! पझुवूरची राणी नंदिनीला भेटा! #PS1 तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये ३० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.” पोस्टरने ऐश्वर्याच्या चाहत्यांनी पूर्णपणे हैराण केले आहे.
Vengeance has a beautiful face! Meet Nandini, the Queen of Pazhuvoor! #PS1 releasing in theatres on 30th September in Tamil, Hindi, Telugu, Malayalam and Kannada. ????@madrastalkies_ #ManiRatnam @arrahman pic.twitter.com/HUD6c2DHiv
— Lyca Productions (@LycaProductions) July 6, 2022
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
एका चाहत्याने ऐश्वर्याच्या फोटोवर कमेंट करत लिहिले की, “भारतीय सिनेमांची राणी परत आली आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “व्वा हीच होती ती, जिची आम्ही वाट पाहत होतो. खूप सुंदर.” ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमासह ऐश्वर्या मागील चार वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाबाबत ऐश्वर्यादेखील खूपच उत्साहित आहे.
कधी होणार प्रदर्शित?
मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ सिनेमा याच नावाने प्रकाशित झालेल्या तमिळ कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी लेखिका कल्कि यांनी लिहिली आहे. यामध्ये ऐश्वर्याव्यतिरिक्त चियान विक्रम, तृषा, जयम रवि, लाल, जयराम, पार्थिबन, कार्थी, प्रभू, आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका असणार आहेत. हा सिनेमा दोन भागांमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. पहिला भाग यावर्षी ३० सप्टेंबरला ५ भाषेत प्रदर्शित होईल. त्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
ऐश्वर्याचे चाहते तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच आतुर झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझ्यात तेवढा दम नाही’, बॉलिवूडच्या तीन खानबद्दल करण जोहरचे खळबळजनक वक्तव्य
लव्ह मॅरेज करण्याचा विचार करताय? जरा थांबा आणि बघा अभिनेता राजकुमार रावची अवस्था