Wednesday, October 15, 2025
Home कॅलेंडर ‘त्या’ वाईट सवयीला टाटा-बाय करुन ४ वर्ष झाल्याने पुजा भटने केले असे सेलिब्रेशन

‘त्या’ वाईट सवयीला टाटा-बाय करुन ४ वर्ष झाल्याने पुजा भटने केले असे सेलिब्रेशन

पूजा भट्ट बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शका आहे. पूजा सध्या अभिनयापासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. नेहमी ती देश-विदेशातील चालू घडामोडीवर तिचे मत सुद्धा सोशल मीडियावरून व्यक्त करत असते, सोबतच तिच्याशी निगडित अनेक गोष्टी सुद्धा ती तिच्या फॅन्स सोबत शेयर करते.

नुकतेच पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या दारू पिण्याच्या सवयीला सोडून चार वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले. यावेळी तिने तिच्या या वाईट सवयीला सोडण्यासाठी ज्यांनी तिला ताकद दिली त्यांना आणि या नव्या आयुष्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली.

यानिमित्ताने पूजाने गुलाबी आकाशाचा एक फोटो आणि एक मेसेज पोस्ट केला आहे. तिने लिहले आहे की, ” संयमाला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. याआधी माझ्यासाठी गुलाबी शॅम्पेन, माल्ट आणि शहरातील गर्दी होती मात्र हाच गुलाबी रंग आज माझ्यासाठी आकाशाचा आणि शहरापासून दूर असणाऱ्या रस्त्यांचा झाला आहे. हा प्रवास मला खूप समृद्ध बनवून गेला आहे.”

“खरंच मी आज माझ्या जीवनाला आणि त्या अलौकिक शक्तींना धन्यवाद करते, ज्यांनी सतत माझ्यावर लक्ष ठेऊन मला माझ्या लक्षाच्या दृष्टीने चालताना खरे आणि कमकुवत बाबींमध्ये मजबूत केले,” असेही पुजा आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते.

पूजाने नेहमीच तिच्या या वाईट सवयींबद्दल अगदी खुलेपणाने बोलणे पसंत केले. तिने तिची ही सवय कधीच लपून ठेवली नाही. तिला दारूच्या व्यसनाला सोडायचे असल्याचेही तिने सार्वजनिकरित्या सांगितले होते. पूजा तिच्या या निर्धारात यशस्वी झाल्याचे आता दिसून येत आहे.

चार वर्षांपूर्वी पूजाने दारू सोडत असल्याचे सांगितले होते. दारू सोडण्याचा ह्या स्वत:शीच सुरू असलेल्या संघर्षाविषयी पूजाने सांगितले होते की, “आपल्या देशात दारूला एक कलंक मानले जाते आणि समाजाच्या भीतीने बाईचे दारू पिणे तर लपवून ठेवले जाते आणि त्यातून महिलांना बाहेर येणे कठिण जाते. मला हा विचार मिटवायचा आहे. एकदा महेश भट्ट यांच्यासोबत फोनवर गप्पा मारताना महेश भट्ट यांनी पूजाला सांगितले होते की, जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर स्वत:वर प्रेम कर, कारण मी तुझ्याआतच राहतो.’ त्यांच्या ह्या वाक्याने पूजाला या निर्णयापर्यंत पोहचवले.

हे देखील वाचा