Friday, April 18, 2025
Home साऊथ सिनेमा ‘न्यूड’ फोटोच्या मागणीला अभिनेत्री पूजा हेगडेची जबरदस्त प्रतिक्रिया; एकदा पाहाच

‘न्यूड’ फोटोच्या मागणीला अभिनेत्री पूजा हेगडेची जबरदस्त प्रतिक्रिया; एकदा पाहाच

बॉलिवूडचे अनेक स्टार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. तसेच ते त्यांच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देत असतात. नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे हिने इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी ‘पोस्ट ए फोटो ऑफ’ या ट्रेंडच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी काही लोकांनी तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचेही प्रयत्न केले. मात्र, याचे उत्तर देताना पूजा हेगडेने एक अतिशय रंजक फोटो शेअर केला आहे.

नुकतेच, पूजाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अनेक फोटो शेअर केले होते, तेव्हा एका व्यक्तीने तिच्याकडून न्यूड फोटोंची मागणी केली. पूजाने अतिशय चतुरतेने त्याला प्रतिक्रिया दिली. तिने चाहत्याच्या या मागणीवर तिच्या उघड्या पायांचे फोटो शेअर केले. याशिवाय तिने बिकिनीमधील फोटोही शेअर केले आहेत. यासोबतच तिने आपल्या चित्रपटाच्या सेटवर अल्लू अर्जुनसोबत वाढदिवस साजरा करतानाचे फोटोही शेअर केले आहेत.

इतकेच नव्हे, तर एका चाहत्याने तिला ‘विचित्र’ क्षण आणि मेकअपशिवाय फोटो पोस्ट करण्याचीही विनंती केली. ‘पोस्ट ए फोटो ऑफ’ सत्र संपल्यानंतर पूजा हेगडेने लिहिले की, ‘मजा आली! दिलेल्या सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद. मी जमेल तितके प्रयत्न केले आणि खूप प्रयत्नांनी माझे फोटो शोधले. धन्यवाद!’

पूजा हेगडेने ऋतिक रोशनच्या ‘मोहेंजोदाडो’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ऋतिक व्यतिरिक्त तिने अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटात काम केले आहे. त्यांच्याशिवाय या चित्रपटात इतरही अनेक कलाकार होते.

त्याचबरोबर पूजाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या तीन मोठ्या तेलुगु चित्रपटांमध्ये काम करत आहे. भास्करच्या ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ या चित्रपटात पूजा हेगडे अखिल अक्किनेनीसोबत दिसणार आहे, तर राधा कृष्ण कुमार यांचे नाटक ‘राधे श्याम’मध्ये ती प्रभाससोबत दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CJfWIeBBeKy/?utm_source=ig_web_copy_link

तसेच पूजा रामचरण, काजल अगरवाल आणि चिरंजीवीच्या चित्रपटात देखील ती दिसणार आहे. याशिवाय ती बॉलिवूडमध्ये दोन मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. ज्यात रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटाचाही समावेश आहे.

हेही वाचा-

“‘केजीएफ: चाप्टर २’ केवळ चित्रपट नाही तर…”, चाहत्याचे पंतप्रधान मोदींना पत्र; सोशलवर भन्नाट व्हायरल

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगची जोडी पुन्हा एकदा दिसणार मोठ्यापड्यावर

नव्वदच्या दशकातील सुपरहिट बालकलाकारांवर आज आलीय ‘ही’ वेळ, कुणी करतंय संघर्ष तर कुणी…

हे देखील वाचा