पूजा सावंतने पुन्हा एकदा सिद्ध केलं प्राण्यावरचं निखळ प्रेम; फोटो पाहून तुम्हीही कराल तिचं कौतुक


मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजा सावंतने चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाने आणि नृत्याने तिला पाहता क्षणीच सगळे तिच्या प्रेमात पडतात. तसेच पूजा सावंत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिचा तगडी फॅन फॉलोविंग झाले आहे. तिचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियन एवढे फॉलोव्हर्स आहेत. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर होता क्षणीच मोठ्या संख्येने लाईक केला जातो. अशातच पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे प्राण्यांवरचे प्रेम दाखवले आहे. 

पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती एका मांजरीसोबत दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. तसेच ती मांजरीला मांडीवर घेऊन तिला गोंजारताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कोणत्याही भटक्या मांजरीला किंवा कुत्र्याला दत्तक घेतल्याने जग बदलणार नाही. परंतु निश्चितपणे त्या एका प्राण्यासाठी जग कायमचे बदलेल.” तिच्या या कॅप्शनवरून हे लक्षात येत आहे की, तिने या मांजरीला दत्तक घेतले आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. खरंतर पूजाला प्राण्यांबद्दल तसेच पक्ष्यांबद्दल खूप प्रेम आहे. या गोष्टीची माहिती आपल्याला वारंवार तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून मिळतच असते. (Pooja sawant share a photos with adopted cat on social media)

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक


Leave A Reply

Your email address will not be published.