मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घातली आहे. अशीच एक अभिनेत्री जिने तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच सगळयांना तिच्या प्रेमात पाडले आहे. ती म्हणजे पूजा सावंत होय. पूजाने तिच्या डान्सने देखील सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित केले आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पूजाने (pooja sawant) अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने कार्पोरेट लूक केला आहे. तिने काळया रंगाचे केवळ ब्लेझर आणि ट्राउझर घातले आहे. तसेच पायात हाय हिल्स घातले आहेत. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या लूकमधील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये पाहून समजत आहे की, ती टेरेसवर उभी आहे. ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (pooja sawant share her photos on social media)
तिचा हा लूक अनेकांना खूप आवडला आहे. तिचे चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत. तिचा हा लूक सोशल मीडियावे वेगाने व्हायरल होत आहे.
पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे. नुकतेच तिचा विजेता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्या आहे.
हेही वाचा :
सुपरस्टार महेश बाबूवर भडकले रश्मिका मंदानाचे चाहते, सोशल मीडियावर व्यक्त केला जातोय संताप
लग्न, अफेअर किंवा गर्भधारणाच नाही, तर खूपच मोठी आहे नुसरत जहाँशी संबंधित वादांची यादी
जेव्हा प्रभासने बसमधील गुंडाची केली होती जोरदार धुलाई, पाहुन विसरून जाल ‘बाहुबली’ची फाईट