Thursday, May 1, 2025
Home बॉलीवूड अनेक अफेयर्स झाल्यानंतर अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी लगीन गाठ तर बांधली मात्र एक्स्ट्रामॅरिटल अफेयरमुळे…

अनेक अफेयर्स झाल्यानंतर अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी लगीन गाठ तर बांधली मात्र एक्स्ट्रामॅरिटल अफेयरमुळे…

कलाकार यांचे व्यावसायिक आयुष्य जेवढे गाजते तेवढेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील मीडियामध्ये नेहमीच चर्चेचाच विषय असतो. बॉलिवूडमधील अभिनेत्रींबद्दल तर भरभरून चर्चा होताना दिसतात. बॉलिवूडमध्ये ८०/९० च्या दशकातील अतिशय प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेल्या पूनम ढिल्लो यांचे वैयक्तिक आयुष्य देखील तुफान गाजले. त्यांच्या आयुष्यातील प्रेमप्रकरणांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर लाईमलाइट मिळाले.

नूरी, त्रिशूल, सोहनी-महेवाल, कर्मा, दर्द आदी अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या पूनम यांनी केवळ वयाच्या १६ वर्षी फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आणि अमाप लोकप्रियता मिळवली. ‘त्रिशूल’ या सिनेमातून पहिल्यांदा त्यांनी कॅमेरा फेस केला आणि अभिनयात पदार्पण केले. मात्र त्यांना खरी ओळख ‘नुरी’ सिनेमाने मिळवून दिली. यातच त्या त्यांच्या अफेयर्समुळे चर्चेत यायला सुरुवात झाली. सर्वात आधी त्यांचे नाव दिग्दर्शक रमेश तलवार यांच्याशी जोडले गेले. मात्र त्यानंतर काही काळातच पूनम आणि यश चोप्रा यांच्या अफेयरच्या बातम्या झळकण्यास सुरुवात झाली आणि पूनम, रमेश यांचे नाते संपले.

त्यानंतर पूनम ढिल्लो यांचे नाव दिग्दर्शक राज सिप्पी यांच्यासोबत जोडले गेले. पूनम यांचे राज यांच्यावर मनापासून प्रेम होते आणि त्यांना त्यांच्याशी लग्न करायचे होते. मात्र राज सिप्पी आधीपासूनच विवाहित असल्यामुळे आणि त्यांना त्यांच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नसल्याने त्यांचे नाते संपुष्टात आले. पुढे त्यांचे नाव निर्माते अशोक ठाकेरिया यांच्याशी जोडले गेले आणि त्यांनी अतिशय घाईघाईत लग्न केले. अनेकांनी त्यांना लग्न करण्यासाठी घाई न करण्याचे सांगितले मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आणि लग्न केले. लग्नानंतर अशोक यांच्या अफेयरच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

रिपोर्टनुसार आपल्या नवऱ्याला अशोक यांना धडा शिकवण्यासाठी पूनम यांनी हॉंगकॉंगचे व्यायवसायिक असणाऱ्या किकूसोबत अफेयर केले. त्यानंतर १९९७ साली अशोक आणि पूनम यांचा घटस्फोट झाला. आता पूनम त्यांच्या दोन्ही मुलांचं सांभाळ एकट्याच करतात. त्या आता विविध कार्यक्रमांना आणि काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारतानाही दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा