Friday, July 5, 2024

Lock Upp | ‘…यावेळी ब्रादेखील नसेल’, पूनम पांडेने पुन्हा एकदा केली टॉपलेस होण्याची घोषणा

अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) ‘लॉकअप’ कार्यक्रम सुरूवातीपासूनच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. या कार्यक्रमातील एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक त्यांच्या बोल्ड आणि वादग्रस्त बोलण्याने नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळेच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आठवणीत राहिला आहे. काही वर्षांपूर्वी मॉडेल पूनम पांडेने (Poonam Pandey) तिला वोट देण्यासाठी प्रेक्षकांना टॉपलेस होण्याचे आश्वासन दिले होते. आता पुन्हा एकदा तिने अशाच प्रकारचे वक्तव्य करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ. 

मॉडेल आणि सध्या लॉकअप मध्ये चर्चेत असलेली पूनम पांडे आपल्या बोल्ड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंनी आणि पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. २०११ मध्ये भारताचा विश्वचषक जिंकल्यानंतर ती टॉपलेस होण्याबद्दल बोलला होती. ज्यामुळे चांगलीच खळबळ माजली होती. काही दिवसांपूर्वीच तिने लॉकअपमध्येही टॉपलेस होण्याची घोषणा केली होती. तिने कार्यक्रमात टॉपही काढला होता.

कार्यक्रमात पूनमने कॅमेऱ्यासमोर येत ‘मला जर भरभरुन मते मिळाली, तर मी नॅशनल टीव्हीवर टॉपलेस होईन. कदाचित यावेळी ब्रासुद्धा नसेल’ असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. पूनमच्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या कार्यक्रमात पूनम पांडे कायमच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. त्यामुळेच आता तिच्या वक्तव्याचीही सर्वत्र चर्चा रंगली असून प्रेक्षकांना विकेंडची उत्सुकता लागली आहे. लॉक अपबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत तीन स्पर्धक अंतिम फेरीत आले आहेत. यामध्ये शिवम शर्मा, मुनव्वर इक्बाल फारुकी आणि प्रिन्स नरुला यांचा समावेश आहे. जसजशी अंतिम फेरी जवळ येत आहे, तसतसा खेळ अधिक तीव्र होत आहे. मुनव्वर फारुकी हा कार्यक्रम जिंकण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचे म्हटले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा