Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

रणवीरच्या ‘त्या’ फोटोंवर अखेर पुनम पांडे बोललीच, म्हणाली ‘तू तर मलाच…’

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंह याने नुकतेच न्यूड फोटोशूट करुन सोशल मीडियात आग लावली आहे. त्याच्या या फोटोशूटचे फोटो त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता या फोटोवर पुनम पांडेनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिची प्रतिक्रिया मात्र सध्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. ( poonam pandey reacts ranveer singh nude photoshoot )

मॉडेल पूनम पांडे ही तसे पाहता वादग्रस्त सेलिब्रिटी आहे. तीने स्वतः अनेकदा बोल्ड सिन्स दिलेत, तर ग्लॅमरस फोटोशूटमुळेही ती चर्चेत आलेली आहे. मात्र, स्वतःच्या बोल्ड फोटोशूटने सर्वांना धक्का देणारी पूनम पांडे, रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटमुळे स्वतः शॉक झाली आहे. आणि त्यामुळे या फोटोंवर तीने तशाप्रकारे प्रतिक्रिया दिली आहे.

पुनमने याबाबत एक ट्विट केले आहे. ज्यात ती रणवीर सिंगला त्याने तिला स्वतःच्या खेळात पराभूत केल्याचे म्हटले आहे. ‘रणवीर सिंग तू मला माझ्याच खेळात हरवले आहेस’ असे तिने म्हटलंय.

रणवीरने केलंय बिंधास्त फोटोशूट..

अभिनेता रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे. पूर्णतः नग्न होऊन रणवीर सिंगने पेपर मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. काही फोटोंमध्ये अभिनेत्याने काळ्या रंगाचा अंडरगारमेंट घातला आहे, तर काही फोटोंमध्ये तो पूर्णपणे नग्न दिसत आहे. ( poonam pandey reacts ranveer singh nude photoshoot )

अधिक वाचा –
रणवीर, लेका काय केलंस हे? चार पैशांसाठी आख्खा ‘नग्न’ झाला अभिनेता, बघा Viral फोटो
‘अलविदा’ I अदनान सामीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

हे देखील वाचा