प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Panday) आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. त्याचबरोबर ती आपल्या विवादास्पद बोलण्याने आणि घोषणांनी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. मात्र पूनम पांडेच्या नावाची सर्वात जास्त चर्चा २०११ च्या वर्ल्ड कप दरम्यान झाली होती. यावेळी “टीम इंडिया फायनल जिंकली, तर मी स्टेडियममध्ये नग्न होईन” अशी घोषणा करून पूनमने सगळ्यांना धक्का दिला होता. यावेळीच पूनम पांडेच्या नावाची सर्वात जास्त चर्चा झालेली पाहायला मिळाली. आता याच मुद्द्यावर पूनम पांडेने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) ‘लॉकअप’ शो सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. या शोमधील सहभागी कलाकारांची नावे आधीच समोर आली आहेत. यामध्ये पूनम पांडे, उर्फी जावेद, शहनाज गिल अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार आहेत. या कार्यक्रमाची आधीपासूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पूनम पांडेच्या बोल्डनेसचा जोरदार तडका यामध्ये पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमात पूनम पांडे आपल्या आयुष्यातील अनेक घटना आणि रंजक किस्से यांचा उलगडा करताना दिसणार आहे. याचवेळी पूनम पांडेने तिच्या २०११ मधील केलेल्या विवादास्पद वक्तव्याचा सुद्धा खुलासा केला आहे.
पूनम पांडे या कार्यक्रमातून आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करण्यास उत्सुक झाली असून, कार्यक्रमात तिने २०११ वर्ल्डकपवेळी केलेल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. यावर पूनमने सांगितले की, “हे वक्तव्य मी फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी केले होते. कारण त्यावेळी मी फक्त मॉडेल म्हणून काम करत होते. मी त्यावेळी अभिनेत्री म्हणून परिचित नव्हते. त्यामुळे या क्षेत्रात प्रसिद्ध होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणूनच मला सांगितले होते की तू लोकांना आकर्षित करायला सुरुवात कर.” लोक तिला फक्त मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखतात, पण या कार्यक्रमातून त्यांना खरी पूनम पांडे काय आहे, हे समजेल असा ही खुलासा केला आहे.
याआधी पूनम पांडेने आपल्या पतीवर मारहाणीचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना तिने सांगितले की, “कोणत्याही महिलेला आपल्यासोबत असे व्हावे असे वाटत नाही. माझ्या बाबतीत जे झाले ते खूप वाईट झाले असे कुणाच्याही बाबतीत होऊ नये.” पुढे बोलताना पूनम पांडेने ती सध्या सिंगल असून कोणासोबतही रिलेशनमध्ये नसल्याची माहिती दिली आहे. थोडक्यात पूनम पांडेच्या या खुलाशाने कंगनाच्या ‘लॉकअप’मध्ये जोरदार राडा बघायला मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. हा शो अल्ट बालाजी आणि एमएक्सप्लेवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा –