मनोरंजन विश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. लोकप्रिय के-पॉप गायिका व गीतकारचे निधन झाले आहे. किम नही हिचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तिच्या अंत्यसंस्कार 10 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. किम नही हिच्या आकस्मिक मृत्यूने के-पॉप जगाला धक्का बसला आहे. तिचे वय फक्त 24 वर्ष होते.
नही (Kim Na-hee) हिचे निधन 8 नोव्हेंबर रोजी झाले. स्थानिक अधिकारी सध्या तिच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहेत. प्योंगटेक ग्योन्गी-डो येथील सेंट्रल फ्युनरल हॉलमध्ये तिला अखेरचा निरोप दिला जाईल. तिच्या मृत्यूची बातमी इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे चाहते शोक व्यक्त करत आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहते श्रद्धांजली वाहत आहेत.
नही हिने 2019 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी इंडी गायिका व गीतकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिने ब्लू नाईट, ग्लूमी डेज, ब्लू सिटी, हाय, लव यू, इत्यादी सुपरहिट ट्रॅक दिले. तिच्या गाण्यांनी के-पॉप जगात धूम केली होती. तिचं शेवटचं गाणं हे तिच्या चाहत्यांसाठी होतं, ते चार महिन्यांपूर्वी रिलीज झालं होतं. नही हिच्या निधनाने के-पॉप जगाला मोठा धक्का बसला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
नही हिच्या निधनाची बातमी समोर आल्यावर तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, ती पोस्ट तिच्या मृत्यूच्या काही तास आधी म्हणजे 7 नोव्हेंबरला शेअर करण्यात आली होती. तिने विंटर कोट घालून तिने थेट कॅमेऱ्यात पाहतानाचा एक छान सेल्फी शेअर केला होता. त्याशिवाय तिने तिच्या लाडक्या श्वानाचे क्युट फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. नही हिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, तिच्या शेवटच्या पोस्टलाही तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. (Popular K-pop singer Kim Na-hee died at the age of 24)
आधिक वाचा-
–कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव
–श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये; एकदा वाचाच