Saturday, April 19, 2025
Home नक्की वाचा Bye Bye 2021: बॉलिवूडमधील ‘या’ गाण्यांनी मिळवलीय प्रेक्षकांची वाहवा, वाचून तुम्हीही लागाल नाचू

Bye Bye 2021: बॉलिवूडमधील ‘या’ गाण्यांनी मिळवलीय प्रेक्षकांची वाहवा, वाचून तुम्हीही लागाल नाचू

बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून रिमेकचा मोठा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनेक रेट्रो गाण्यांचा रिमेक केल्यानंतर, निर्मात्यांची नजर आता ९०च्या दशकातील गाण्यांवर आहे. विशेष म्हणजे, या वर्षी अनेक रिमेक गाणी चार्टबस्टर्समध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली. यावर्षी रिलीझ झालेल्या अनेक रिमेक ट्रॅकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नजर टाकूया अशाच काही गाण्यांवर…

टिप टिप बरसा पानी (सूर्यवंशी)
साल १९९४च्या ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यातील रवीना टंडनचा मनमोहन अभिनय तुम्हाला आठवत असेल. हे ९० च्या दशकातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्याचा रिमेक अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात पाहायला मिळाला आणि या गाण्यात कॅटरिना कैफलाही खूप पसंत केले जात आहे.

नदीयों पार (रूही)
जान्हवी कपूर अभिनित ‘रूही’मधील हा ग्रुवी नंबर, ज्याने देशाला आपल्या तालावर नाचवले, ते देखील रिमेक आहे.

ना जा (सूर्यवंशी)
या यादीत पंजाबी गाण्याचा आणखी एक रिमेक आहे. सूर्यवंशी चित्रपटातील अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफच्या या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली. याचे ओरिजनल व्हर्जन २०१७ मध्ये रिलीझ झाले होते.

लेहेंगा (सत्यमेव जयते २)
जस्स मानकचे ‘लेहेंगा’ एक उत्कृष्ट गाणे आहे, ज्याने काही वेळातच प्रचंड लोकप्रियता मिळवली. जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटासाठी जस्स मानक आणि झारा खान यांनी हे गाणे रिमेक केले होते.

सीटी मार (राधे)
सलमान खान आणि दिशा पटानी यांनी ‘राधे’मधील ‘सीटी मार’मध्ये धमाल केली आहे.

पण तुम्हाला माहित आहे का, की हा अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे अभिनीत लोकप्रिय तेलुगु ट्रॅक ‘सीटी मार’ रिमेक होता.

हेही वाचा :

हेही पाहा-

हे देखील वाचा