बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्यांची अनेक बाबतीत तुलना अनेकदा झालेली पाहायला मिळते. दाक्षिणात्य अभिनेते त्यांच्या कामामुळे हिंदी चित्रपट जगतातील अभिनेत्यांपेक्षा प्रसिद्ध आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट जोरदार यशस्वी होत असतो. हे दाक्षिणात्य कलाकार त्यांच्या राज्यात हीरो असले तरी त्यांनी हिंदी चित्रपटात येऊन खलनायकाची भूमिका साकारूनही भरपूर लोकप्रियता मिळवतात. पाहूया कोण आहेत ते कलाकार.
प्रकाश राज – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय, दिग्गज अभिनेते अशी प्रकाश राज यांची ओळख आहे. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते. त्यांच्या जास्तीत जास्त भूमिका ह्या नकारार्थीच जास्त असतात तरीही ते प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी ‘दबंग’ ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटात खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. त्यांच्या या भूमिका लोकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. प्रकाश राज हे सर्वात जास्त मानधन घेणारे कलाकार म्हणून ही ओळखले जातात त्यांच्या चित्रपटांइतकीच राजकारणाची सुद्धा नेहमी चर्चा होत असते.
राणा दग्गुबती – राणा दग्गुबतीसुद्धा आपल्या नकारात्मक भूमिकेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. तरीही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. ते दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटात सुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘बाहुबली’ चित्रपटातील भूमिका प्रचंड यशस्वी ठरली होती.
किच्चा सुदीप – कन्नड चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेता म्हणून सुदीपची ओळख आहे. सुदीपचा मोठा चाहता वर्ग आहे. आता कन्नड चित्रपटांप्रमाणे त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतसुद्धा लोकप्रियता मिळवली आहे. ‘दबंग 3’ चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारूनसुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. आगामी काळात तो अनेक हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
नस्सर – तामीळ चित्रपटात आपल्या अभिनयाने लोकप्रिय ठरलेले नस्सर हिंदी चित्रपटातसुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांना नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी जास्त मागणी असल्याचे पाहायला मिळते. ‘बाहुबली’ चित्रपटातसुद्धा त्यांनी अशी भूमिका साकारली होती.
रमी रेड्डी – रमी रेड्डी हे तेलुगू चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी फक्त तामीळच नव्हेतर हिंदी चित्रपटातसुद्धा भूमिका साकारल्या आहेत. 90 च्या दशकातील ते आघाडीचे खलनायक होते. ‘ये वक्त हमारा है’, ‘दिलजले’सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्यांच्या भूमिकेची नेहमीच चर्चा पाहायला मिळत होती.
या कलाकारांनी नकारात्मक भूमिका साकारूनही त्यांना मिळालेली लोकप्रियता हेच त्यांच्या अभिनयाचे सर्वात मोठे यश आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
हॉट निया शर्मा! टीव्ही अभिनेत्रीच्या बोल्डनेसने केली हद्दपार…
जेव्हा वैजयंती मालासोबत असलेल्या प्रेमसंबंधाची भनक लागली होती राज कपूर यांच्या पत्नीला, तेव्हा साडे चार महिने…