Friday, February 3, 2023

प्रभासमुळे अनुष्का शेट्टीने ऐनवेळी दिला होता लग्नाला नकार, आजपर्यंत आहे अविवाहित

‘बाहुबली’ चित्रपटातून जगभर प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता प्रभासचा आज 43 वा वाढदिवस. प्रभास सध्या दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रातील सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलिवूडच्या चित्रपटातही काम केले आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की, आपल्या लूक आणि स्टाइलने तरुणाईला भुरळ घालणारा 43वर्षीय प्रभास आजही अविवाहित आहे. ‘बाहुबली’ चित्रपटातील देवसेना म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत त्याच्या प्रेम प्रकरणाची चर्चा जोरदार रंगली होती. इतकेच नव्हेतर अनुष्का शेट्टीचा जमलेला विवाहसुद्धा प्रभासमुळे मोडला अशाही चर्चा सुरू होत्या. नेमकं काय आहे प्रकरण चला जाणून घेऊ.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचे पूर्ण नाव वेंकटा सूर्यनारायण प्रभास राजू असे आहे. प्रभासचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. बाहुबली चित्रपटातील दमदार भूमिकेमुळे प्रभासला जगभर प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शेट्टीने काम केले होते. चित्रपटात दोघांची सुंदर केमिस्ट्री दिसून आली होती. परंतु अनुष्का शेट्टीच लग्न प्रभासमुळे होता होता राहीलं, याबद्दल खुप कमी लोकांना माहिती आहे. यामागचं कारण ऐकून तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. (Prabhas is bachelor at age of 42 when he stopped Anushka shetti s marriage)

चित्रपट क्षेत्रातील यशस्वी अभिनेता प्रभास इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. तरुणाईच्या गळ्यातला ताईत असलेल्या प्रभासवर लाखो तरुणी फिदा आहेत. तरीही त्याने आजपर्यंत लग्नाचा विचार केला नाही. काही वर्षांपूर्वी त्याच्या आणि अनुष्का शेट्टीच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती. या दोघांनी मात्र त्या चर्चांना कधीच दुजोरा दिला आहे. परंतु विशेष म्हणजे आजपर्यंत दोघेही अविवाहित आहेत.

प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या प्रेम प्रकरणाची इतकी चर्चा रंगली होती की, प्रभासने अनुष्काचे लग्न सुद्धा मोडले होते. असे म्हटले जाते की अनुष्काच्या लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. मात्र प्रभासमुळे ऐनवेळी अनुष्काने लग्न करण्यास नकार दिला होता. माध्यमातून समोर आलेल्या बातमीनुसार 2015 मध्येच अभिनेत्री अनुष्का शर्माचा विवाह बंधनात अडकणार होती. त्यावेळी ती ‘बाहुबली’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. तिच्या लग्नाची तयारी सुद्धा जोरदार सुरू होती. परंतु प्रभासला मात्र अनुष्काचा हा निर्णय मान्य नव्हता.

असे म्हटले जाते की, त्यावेळी प्रभासने अनुष्काला सध्या पूर्ण लक्ष बाहुबली चित्रपटावर केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला अनुष्काला पटल्याने तिने लग्नाला नकार देऊन 5 वर्षतरी याबाबत विचार न करण्याचा निर्णय घेतला होता. आज वस्तुस्थिती अशी आहे की, ‘बाहुबली’ चित्रपटातील भूमिकेमुळे अभिनेता प्रभास प्रसिद्धीच्या शिखरावर उभा आहे. आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टीने सुद्धा आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान अनुष्काचे लग्न थांबवल्याने दोघांच्या प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा माध्यमांत रंगू लागली होती. परंतु या दोघांनी प्रत्येक वेळी आम्ही चांगले मित्र आहोत आणि आम्ही कधीही लग्न करणार नाही, असे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. सध्या दोघेही आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असून त्यांच्या लग्नाची कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-
नादच खुळा! कमाईच्या बाबतीत आमिर खानलाही टक्कर देते पत्नी किरण राव, जाणून घ्या तिची एकूण संपत्ती
बाबाे! लग्नानंतरही श्वेता बच्चनला करावी लागली नोकरी, भाऊ अभिषेककडून घ्यावे लागले कर्ज

हे देखील वाचा