नादच खुळा! कमाईच्या बाबतीत आमिर खानलाही टक्कर देते पत्नी किरण राव, जाणून घ्या तिची एकूण संपत्ती


किरण राव ही सिनेसृष्टीतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका, पटकथा लेखक आहे. शिवाय किरण एक यशस्वी पत्नी आणि आई देखील आहे. आमिर खानची बायको असणाऱ्या किरणने स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे. पठडीबाहेरील चित्रपटांचे दिग्दर्शन, निर्मिती यांसाठी किरण ओळखली जाते. या ग्लॅमर जगात वावरत असूनही किरण ‘पाणी फाउंडेशन’ नावाच्या संस्थेची सहसंस्थापक देखील आहे. एका सुपरस्टारची बायको असलेली किरण कोणत्याही बाबतीत आमिरच्या मागे नाही.

किरणने तिच्या करिअरची सुरुवात आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ या सिनेमापासून केली. या सिनेमात तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर तिने गोवारीकरांच्या ‘स्वदेस’ सिनेमातही सहाय्यक दिग्दर्शन केले. फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता है’ सिनेमात एकदम छोटीशी भूमिका देखील साकारली. २०११ साली किरणने ‘धोबीघाट’ सिनेमातून तिचे दिग्दर्शकीय पदार्पण केले. या चित्रपटाचे लेखनही तिनेच केले होते.

किरणने २००५ साली आमिर खानसोबत लग्न केले. मात्र, लग्नानंतर तिने तिचे काम सुरू ठेवले. किरणने ‘जाने तू…या जाने ना’, ‘धोबी घाट’, ‘दंगल’, ‘तलाश’, ‘सीक्रेट सुपरस्टार’, ‘पीपली लाइव’ आदी सिनेमांची निर्मिती केली आहे. किरणने एक दिग्दर्शक म्हणून स्वतःचे स्थान मिळवले आहेत. यशस्वी कलाकारांच्या पत्नींमध्ये किरणचे नाव देखील घेतले जाते.

किरण प्रत्येक गोष्टीत तिचा नवरा असलेल्या आमिरला तोडीस तोड टक्कर देते. कमाईच्या बाबतीतही किरण मागे नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, किरणची एकूण संपत्ती २० मिलियन डॉल इतकी आहे. किरणकडे स्वतःचे घर, अनेक महागड्या गाड्या देखील आहेत.

तसे पहिले तर किरणांची एकूण संपत्ती नक्की किती आहे याबद्दल जास्त कोणाला माहिती नसली, तरीही २०२० मधील आकडेवारीनुसार तिच्याकडे १४६ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते.

तसं पाहिलं तर आमिर खानने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याची एकूण संपत्ती ही जवळपास १४३४ कोटी रुपये इतकी आहे. तो एका चित्रपटासाठी ८५ रुपये घेतो.

किरण आणि आमिर खान यांना आझाद नावाचा एक मुलगा असून, हा मुलगा त्यांना सरोगसीमार्फत झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल’मधील स्पर्धकाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारली होती थोबाडीत; जुना व्हिडिओ व्हायरल

-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.