आपल्या भारतात सिनेमे हे संगीत, कथा, दिग्दर्शक यांच्या नावावर नाही, तर सिनेमात मुख्य कलाकार कोण आहेत, यावर चित्रपटगृहांमध्ये पाहिले जातात. कलाकार हा चित्रपटाचा आरसा असतो. त्यामुळे या कलाकारांवर चित्रपटाच्या निर्मात्यांना खूपच विश्वास असतो. कलाकार देखील त्याची प्रसिद्धी, सिनेमाची कथा, तो किती मोठा सिनेमा आहे, यावरून त्याची फी ठरवतो. जेव्हा नवीन सिनेमा, येतो तेव्हा कलाकारांच्या फीसोबतच, त्या सिनेमाच्या बजेटचीही चर्चा होतेच होते. त्याने आपल्या आयुष्यातील ५ वर्षे ‘बाहुबली’च्या फ्रँचायझीसाठी खर्च केलीत आणि त्याचं फळही त्याला मिळालं. त्यानं बाहुबलीसाठी २०, तर ‘बाहुबली २’ साठी २५ कोटी रुपये घेतले होते.
यानंतर तो आता फक्त साऊथ इंडस्ट्रीसाठी मर्यादित न राहता संपूर्ण जगात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणून ओळखला जातोय. आता हाच प्रभास (prabhas) आगामी ५ बिग बजेट सिनेमांमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे हे सिनेमे हिंदीतही रिलीज केले जातील. या सिनेमांचं एकूण बजेट १५०० कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जातंय. कोणते आहेत ते सिनेमे? जाणून घेऊया या लेखातून.
आदिपुरुष
आदिपुरुष या सिनेमासाठी तब्बल १५० कोटी रुपये मानधन घेत प्रभासने एक नवीनच रेकॉर्ड सेट केला. तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला. या सिनेमात तो आदिपुरुष म्हणजेच रामाची भूमिका साकारतोय, तर अभिनेता सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर क्रिती सेनन सीता, तर सनी सिंग लक्ष्मण ही भूमिका निभावतोय. एवढी मोठी भूमिका आणि एवढं जास्त मानधन घेणार म्हटल्यावर विचार करा. या सिनेमाचं बजेट पण किती जास्त असेल. तर या सिनेमाचं बजेट तब्बल ५०० कोटी रुपये आहे. हा सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ‘तान्हाजी’ हा सुपरहिट सिनेमा देणाऱ्या ओम राऊतच्या खांद्यावर आहे. हा २०२२ मधल्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे.
राधे श्याम
प्रभासचा राधे श्याम हा सिनेमादेखील बिग बजेट असलेल्या सिनेमांपैकी एक आहे, जो एक रोमँटिक थ्रिलर सिनेमा आहे. राधे श्याम’ १९७० च्या दशकातील युरोपच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. परंतु त्याबद्दल बरीच अटकळ आहे. काहींचा असा विश्वास आहे की, हा सिनेमा पडद्यावर पुनर्जन्म किंवा काळाचा प्रवास दाखवेल. काहीजण तर असंही म्हणतात की, ‘राधे श्याम’ हा सिनेमा रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या रहस्याबद्दल आहे. पण काहीही असो, या सस्पेन्सने चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढलीये. या सिनेमात आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री पूजा हेगडे प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणारंय. या सिनेमाचं बजेट ३५० कोटी रुपये आहे. हा सिनेमाही ३० जुलै, २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातंय.
सालार
१०० कोटी रुपये खर्चून केजीएफ २ सिनेमाचं दिग्दर्शन करणारे प्रशांत नील प्रभाससोबत ‘सालार’ हा बनवत आहेत. ‘सालार’ हा एक ऍक्शन सिनेमा आहे. हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा १४ एप्रिल, २०२२मध्ये रिलीज होऊ शकतो. या सिनेमात प्रभाससोबत श्रुती हासन आणि साऊथ सिनेमांचा सगळ्यात प्रसिद्ध असलेला व्हिलन जगपती बाबू दिसणारंय. या सिनेमाचं बजेट १५० कोटी रुपये आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बजेटच्या डबल म्हणजेच तब्बल ३०० कोटी रुपये कमाई करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे.
स्पिरिट
‘स्पिरिट’ हा प्रभासचा २५ वा सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंग’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा करतायेत. स्पिरिट हा सिनेमा तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदीत रिलीझ तर होणारंचय. पण त्याचबरोबर जपानी, चायनीज आणि कोरियन या आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ऍक्शन ड्रामा असणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत काजल अग्रवाल आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणार असल्याचं म्हणलं जातंय. या सिनेमाचं बजेटही ५०० कोटींपेक्षा असेल. त्याने या सिनेमासाठी १५० कोटी रुपये घेतले असून यात त्याचा आतापर्यंतचा सर्वात वेगळा लूक पाहायला मिळेल.
प्रोजेक्ट के
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करायला नेहमीच इतर सिनेसृष्टीतील कलाकार उत्सुक असतात. अशातच नाग अश्विन दिग्दर्शित ‘प्रोजेक्ट के’ या साय-फाय फँटसी सिनेमात प्रभाससोबत अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण असल्याचं म्हणलं जातंय. या सिनेमाचे दोन शेड्यूलही पूर्ण झालेत. हा सिनेमाही ५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला जाणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्सवरून समजतं. हा सिनेमा १४ जानेवारी, २०२२ मध्ये रिलीझ होणार होता. पण आता हा सिनेमा पुढील वर्षी रिलीझ होईल असं सांगितलं जातंय.
विशेष म्हणजे, प्रभासने आपल्या मानधनात वाढ केली असून तो प्रत्येक सिनेमासाठी १०० कोटी रुपये घेतो. मात्र, काही सिनेमात त्याने १०० कोटींहून अधिक रुपये घेतलेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संगीतविश्व समृद्ध करणारे संगीतकार अजय- अतुल, वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास
‘साई तुझं लेकरू’ ‘टाइमपास ३’मधील पहिले धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
‘अनन्या’ चित्रपटातील ऋताचा रोमँटिक अंदाज आला समोर, नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला