फ्लॉप चित्रपट देऊनही अभिनेता प्रभासने वाढवले मानधन, आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

0
75
Prabhas
Photo Courtesy: Instagram/actorprabhas

प्रभास (Prabhas) हा देशातील सर्वात महागडा स्टार मानला जातो आणि त्याने चित्रपटांच्या फीच्या बाबतीत केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सनाही मागे टाकले आहे. बाहुबलीपूर्वी या अभिनेत्याचे स्टारडम केवळ साऊथ सिनेमांपुरतेच मर्यादित होते, मात्र आता तो देशभरातील आवडता स्टार बनला आहे. राजामौली यांच्या चित्रपटाने प्रभासला एक जागतिक स्टार बनवले, ज्यामुळे त्याची लोकप्रियता तर वाढलीच पण फीमध्येही प्रचंड वाढ झाली. ‘बाहुबली’ फ्रँचायझीमध्ये काम केल्यानंतर, जगभरातील लोकप्रियता  प्रभासला मिळाली आणि त्यानंतर त्याने त्याची फी दुप्पट केली. पण याच दरम्यान प्रभासने पुन्हा एकदा त्याचे मानधन वाढवल्याचे ऐकायला मिळत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने त्याच्या सध्याच्या फीमध्ये सुमारे 25 टक्के वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बाहुबली’ त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांना 20 कोटी रुपये अतिरिक्त मागितले आहेत. या चित्रपटासाठी त्याच्याकडून 100 कोटी रुपये घेतले जात असल्याची माहिती आहे पण आता त्याने निर्मात्यांना यापेक्षा 120-125 कोटी रुपये अधिक भरण्यास सांगितले आहे. मात्र, प्रभासने याबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

प्रभास सुपरहिट स्टार असून आगामी चित्रपटात तो प्रभू श्री रामची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 500 कोटी रुपये खर्चून बनवला जात असून यामध्ये क्रिती सेननही सीतेची भूमिका साकारणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रभासने अशा वेळी आपली फी वाढवली आहे जेव्हा काही चित्रपट सोडले तर बहुतेक चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्यासाठी धडपडत आहेत. दुसरीकडे फी अशा वेळी वाढली आहे जेव्हा त्याचा मागील चित्रपट ‘राधे श्याम’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता, जो एक बिग बजेट चित्रपट होता. याआधी त्याचा ‘साहो’ देखील प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही.

प्रभासच्या या निर्णयामुळे चित्रपट निर्मात्यांवर दबाव निर्माण झाला असून ते नाराज झाले आहेत. त्यांनी अभिनेत्याची मागणी मान्य केल्यास ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे बजेटही २५ टक्क्यांनी वाढेल. आणि ‘आदिपुरुष’चा एक मोठा भाग अजून शूट व्हायचा आहे ज्यात प्रभासचा महत्त्वाचा सीन शूट करायचा आहे. प्रभासशिवाय हिंदू पौराणिक कथांवर आधारित ‘आदिपुरुष’मध्ये सैफ अली खान देखील रावणाची भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
मलायका अरोरा झाली धोक्याची शिकार; अभिनेत्रीच्या बहिणीनेच तिच्या नकळत केलं ‘असं’ काही
मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here