Tuesday, July 9, 2024

‘सालार’ची एंट्री दणक्यात; ‘या’ ठिकाणी लावला 120 फूट उंचीच प्रभासचा होर्डिंग्स, व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध अभिनेता प्रभासचे (Prabhas ) लाखो चाहते आहेत. त्याने त्याच्या अभिनयच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. प्रभास (Prabhas Photos) सध्या त्याच्या अगामी चित्रपटामुळे चांंगलाच चर्चेत होता. प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाची रिलीज डेट अगदी जवळ आली आहे. चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. अवघ्या काही दिवसांत हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, आता ‘सालार’चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल व्हायरल होत आहे.

सालार‘ त्याच्या नवीन ट्रेलरसाठी देखील चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी (18 डिसेंबर) प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘सालार’च्या निर्मात्यांनी अधिकृत ट्विटर पेजवर मुंबईच्या आर मॉलचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये प्रभासच्या होर्डिंग्सचा सेटअप दिसत आहे. ‘सालार’च्या स्वागताची तयारी निर्मात्यांनी सुरू केली आहे. रिलीजपूर्वी आर मॉलमध्ये प्रभासचा 120 फूट उंच होर्डिंग्स (Prabhas Banners) बसवण्यात आला आहे. सालारचे हे पोस्टर तयार करण्यासाठी सुमारे 125 जणांच्या टीमने एकत्र काम केले आहे. व्हिडिओमध्ये कामगार मॉलच्या बाहेर होर्डिंग्स साठी मेहनत करताना दिसत आहेत.

‘सालार’च्या ऍडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाची अवघ्या तीन दिवसांत लाखो तिकिटांची विक्री झाली आहे. यासोबतच ‘सालार’ने रिलीजपूर्वीच करोडोंचा व्यवसाय केला आहे. रिपोर्टनुसार, रविवारपर्यंत ‘सालार’ची 1,56,888 तिकिटे विकली गेली आहेत. त्याच वेळी, कमाई 3.7 कोटींच्या जवळ पोहोचली आहे.

‘सालार: सीजफायर पार्ट-1’चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. तर, होंबळे फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली आहे. ‘सालार’मध्ये प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपती बाबू हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट काही दिवसांनंतर 22 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Prabhas video of hoardings 120 feet high in Mumbai to welcome Salaar went viral)

आधिक वाचा-
‘अ‍ॅनिमल’ने काबीज केलं बॉक्स ऑफिस; रणबीर कपूरच्या चित्रपटाने 17व्या दिवशी केली नादखुळा कमाई
समांथा रुथ प्रभू दुसरं लग्न करणार? चाहत्याने थेट प्रश्न विचारल्यावर अभिनेत्री म्हणाली…

हे देखील वाचा