Wednesday, February 21, 2024

बहुप्रतिक्षित ‘सालार’ चित्रपटाच ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला, प्रभास दिसला जबरदस्त अवतारात

साऊथ सुपरस्टार प्रभासच्या ‘सालार‘ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते चित्रपटाशी संबंधित छोट्याशा माहितीची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी या चित्रपटाचा दमदार ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रभासचा डॅशिंग अवतार पाहायला मिळाला. याआधी, हा चित्रपट हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर असेल असे संकेत टीझरने दिले होते. याची झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये प्रभास अॅक्शन सीन करताना दिसत आहे.

‘सलार: पार्ट 1 – सीझफायर’च्या निर्मात्यांनी प्रभासच्या (Prabhas) आगामी बिग बजेट चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटाच्या भव्य प्रदर्शनासाठी तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. ‘आदिपुरुष’ नंतर, प्रभास ‘सालार’ घेऊन परतला आहे, जो दोन मित्रांबद्दल आहे. जे एकमेकांचे सर्वात वाईट शत्रू बनतात. ट्रेलरमध्ये पृथ्वीराज सुकुमारनचा खतरनाक अवतार दिसतो, जो शत्रूंशी लढतो.

एका वेळी त्याला त्याचा मित्र देवाची गरज असते, त्यानंतर प्रभास एंट्री करतो. शंभर लोकांच्या गर्दीला तोंड देण्यासाठी एकटा प्रभास पुरेसा आहे. ट्रेलरमध्ये प्रभास एकामागून एक शत्रूंचा खात्मा करताना दिसत आहे. त्याचवेळी, जगपती बाबूची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. ट्रेलरच्या शेवटी प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांची रक्तात भिजलेली झलक दाखवण्यात आली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यात ‘केजीएफ’ची झलक आहे. प्रभासने वेगवेगळ्या भाषांमध्ये पृथ्वीराज सुकुमारन स्टारर चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील शेअर केले आहे.

‘सालार’ हा प्रभास आणि प्रशांत नील यांच्यातील पहिला सहयोग देखील आहे आणि हा दिग्दर्शकाचा पहिला तेलगू प्रकल्प असेल. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, श्रुती हासन, टिनू आनंद, ब्रह्माजी, ईश्वरी राव आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे संगीत रवी बसरूर यांनी दिले आहे. हा चित्रपट तेलगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘सालार’ 22 डिसेंबरला रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.

प्रभासच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ‘सालार’ नंतर प्रभास नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या सायन्स फिक्शन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कमल हासन, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती सी.अश्वनी दत्त यांनी केली आहे, तर चित्रपटाचे संगीत संतोष नारायणन यांनी दिले आहे. हा चित्रपट 2024 च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. (The trailer of Prabhas much awaited movie Saalar is here for the fans)

आधिक वाचा-
एड्ससंबंधी जागरूकता निर्माण करणारे बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट बघितलेत का? वाचा यादी
पंकज कपूर यांनी१६ वर्षांच्या नीलिमा यांच्याशी केले होते लग्न, मात्र केवळ ९ वर्षातच झाला घटस्फोट

हे देखील वाचा