Thursday, September 5, 2024
Home बॉलीवूड प्राची देसाई सोशल मीडियावर जास्त सक्रिय का नसते? अभिनेत्रीने सांगितले मोठे कारण

प्राची देसाई सोशल मीडियावर जास्त सक्रिय का नसते? अभिनेत्रीने सांगितले मोठे कारण

अभिनेत्री प्राची देसाईने (Prachi Desai) आपल्या करियरची सुरवात २००७ साली आलेली टीव्ही सिरीअल ‘कसम से’ या एकता कपूरच्या सिरीअलमधून केली होती. नंतर ती ‘झलक दिख जा २’च्या सिझन मध्ये दिसली. अभिनेत्री प्राची देसाईने एका मूलाखतीच्या वेळी अनेक खुलासे केले. तिने तिच्या आवडत्या गोष्टींबद्दल सांगितले आहे.

प्राची देसाईने आपल्या बॉलीवूड करीयरची सुरवात ‘रॅाकऑन’ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात केली.नंतर तिने‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘एक विलेन’, ‘बोल बच्चन’ या सिनेमात दिसली. २०२४च्या एप्रिल महिन्यात तिचा ‘साइलेन्स 2’हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या दरम्यान झालेल्या मुलाखतीत तिने तिच्या स्वतःबाबतीत अनेक खुलासे केले.

ती म्हणाली की, “मी खूप राखीव व्यक्ती आहे. मला पार्टी करायला आवडत नाही. आणि मी स्वतःला सोशल मिडीयापासून जमेल तितक दूर ठेवते. याच मूलाखतीत तिने तिच्या आवडीबद्दल सुद्धा सांगितलं आहे. ती पुढे म्हणाली, “माझे मित्र मला अनेकदा म्हणतात कि मी सोशल मिडीयावर जास्त सक्रीय राहीलं पाहिजे. पण मला प्राइवेसी आवडते. मागच्या काही वर्षात मी खूप काम करत नव्हते .कारण मला एक सारखे रोल ऑफर होत होते आणि त्याचा मला कंटाळा आला होता. आणि जेव्हा माझ्याकडे चांगले प्रोजेस्ट आले तेव्हा महामारी सुरू झाली आणि मला दोन वर्षाचा ब्रेक घ्यावा लागला.”

प्राची म्हणाली ‘साइलेंस 1’आणि‘साइलेंस 2’ ने तिला नविन रोल करण्याची संधी दिली आहे.अबन भरुचा देवां यांनी या सिनेमाच दिग्दर्शिन आणि लेखन केले आहे.हा चित्रपट एक मिस्ट्री आणि थ्रिलर चित्रपट आहे.यात प्राची देसाईसोबत, मनोज बाजपेयीआणि पारुल गुलाटी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.आणि तिली हा वेगळा रोल करून नविन संधी मिळाल्यामूळे ती आनंदात आहे असं तिच म्हणण आहे. याशिवाय प्राची देसाई सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर फॉरेन्सिक या चित्रपटात झळकली होती.यात प्राची एका निगेव्टिव रोल मध्ये झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी नव्या सीझनमध्ये रितेशचा कल्ला सुरू होणार
अनंत आणि राधिका अडकले लग्न बंधनात; लग्नातील पहिला फोटो आला समोर

 

हे देखील वाचा