मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रदिप पटवर्धन (pradeep patwardhan) यांच्या निधनाने संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. मंगळवार दिनांक (९, ऑगस्ट) रोजी प्रदिप पटवर्धन यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने दुखःद निधन झाले. मुंबईमधील गिरगाव येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. एक हरहुन्नरी कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रदिप पटवर्धन यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
प्रदिप पटवर्धन हे मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्यांनी सिने जगतात त्यांच्या अभिनयाची छाप पाडली होती. प्रदिप पटवर्धन यांचा सिने जगतातील प्रवास गिरगावमधून सुरू झाला. त्यांचे बालपणही गिरगावमध्येच गेले आणि याच गिरगावमध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. गिरवामध्येच त्यांचे बालपण गेल्याने त्यांच्या अनेक आठवणी या ठिकाणाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळेच गिरगावमधील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.
दहिहंडी असो किंवा गणेशोत्सव असो ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रदीप पटवर्धन दहीहंडीच्या गाण्यावर चाळीत बेधुंद होऊन नाचताना दिसत आहेत. गिरगावच्या चाळीत साजरा होणारा दहीहंडी उत्सव प्रदीप यांच्यासाठी खूपच विशेष असायचा. वयाच्या 65व्या वर्षीही प्रदीप यांच्यातील कलाकार तितकाच उत्साही होता हे व्हिडिओ पाहून लक्षात येतंय. व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनाला चटका लावून जात आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.
View this post on Instagram
आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रदिप पटवर्धन यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तसेच नाटकात काम केले आहे. त्यांनी मोरुची मावशी, एक फुल चार हाफ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.
हेही वाचा – दोनदा लग्न तुटल्याने ट्रोल होणाऱ्या श्वेताने सोडले मौन; म्हणाली, ‘अनेकजण घरी बायको असतानाही बाहेर…’
ब्रेकिंग! प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका, दिल्लीच्या मोठ्या रुग्णालयात दाखल
ट्रोलर्सला कंटाळून आमिरने एकदाच बोलून टाकले, ‘आता मला माफ करा’, व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक