Wednesday, March 22, 2023

ब्रेकिंग! प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका, दिल्लीच्या मोठ्या रुग्णालयात दाखल

मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव याला हृदयविकाराचा झटका आला आहे. राजूला हा झटका आल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेतली जात आहे. या बातमीने कलाविश्वालाही मोठा धक्का बसला आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हा जिममध्ये व्यायाम करत होता. त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका (Raju Srivastava Heart Attack) आला. यानंतर त्याला लगेच दिल्ली येथील एम्स रुग्णालयात (Delhi Aiims Hospital) हलवण्यात आले. चाहते राजूची तब्येत ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

यापूर्वी आलेत झटके
राजू श्रीवास्तव याच्या हृदयाशी संबंधित आधीही समस्या राहिल्या आहेत. त्याला यापूर्वीही झटके आले आहेत. राजूच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, सध्या एम्सचे डॉक्टर त्याच्या शस्त्रक्रियेबद्दल निर्णय घेत आहेत की, ती कशाप्रकारे केली पाहिजे.

राजूबद्दल थोडक्यात
राजू श्रीवास्तव याच्याबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या भाजप नेता आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचा अध्यक्ष आहे. नोएडा येथील फिल्म सिटी स्थापन करण्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून तो प्रमुख भूमिका बजावत आहे.

हे देखील वाचा