Wednesday, July 3, 2024

पदार्पणातच दाक्षिणात्य सिनेमात ऍक्शन करताना दिसणार अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. महाराणी ‘येसूबाई’ ही भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने साकारत घराघरात तुफान लोकप्रियता मिळवली. आजही प्राजक्ताचे नाव उच्चारले तरी सर्वात आधी तिची ‘येसूबाई’ हीच भूमिका सर्वांना आठवते, इतकी सुंदर ही तिची भूमिका होती. त्यानंतर प्राजक्ता ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतही दिसली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्राजक्ता प्रकाशझोतात आली असून, यावेळेस तिचे चर्चेत येण्याचे कारण खूपच वेगळे आणि आनंदाचे आहे.

मकरसंक्रांतीचे औचित्य साधत प्राजक्ताने ती लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार असल्याचे जाहीर केले होते. याचवर्षी अर्थात २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘चेकमेट’ या सिनेमात प्राजक्ता झळकणार असून संक्रांतीच्या दिवशी तिने या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. सोशल मीडियावर तुफान सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताने या चित्रपटाच्या शुटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र हे फोटो नेहमीच्या फोटोपेक्षा काहीसे वेगळे असल्याने ते फोटो इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती या सिनेमाच्या ऍक्शन सीनचे शूटिंग करत असल्याचे दिसत आहे. यात तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला असून, तिच्या चेहऱ्यावर काही जखमा देखील दिसत आहे, तर एका फोटोमध्ये तिने हातात गन पकडून पोज दिली आहे. प्राजक्ताने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “आता साऊथ चित्रपट म्हटल्यावर एक्शन सीन्स तर असणारच… मेकअप दादांची कमाल.. टीझर शूट.” या फोटोंवरून एक तर नक्की प्राजक्ता करत असलेला सिनेमा हा एक ऍक्शनपट असून, त्यात ही देखील ऍक्शन करताना दिसणार आहे.

सध्या प्राजक्ता काही चित्रपटांमध्ये काम करत असून, तिचा काही महिन्यांपूर्वी ‘साजणी’ नावाचा एक म्युझिक अल्बम देखील झळकला होता. या अल्बममध्ये ती एका वेगळ्याच रूपात दिसली होती. हे गाणे यूटुबवर खूपच गाजले.

हेही वाचा :

हे देखील वाचा