Monday, February 9, 2026
Home मराठी ‘प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन पुरस्कारांमध्ये’, रायझिंग स्टार सन्मानानंतर प्राजक्ता माळीने मानले सर्वांचे आभार

‘प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन पुरस्कारांमध्ये’, रायझिंग स्टार सन्मानानंतर प्राजक्ता माळीने मानले सर्वांचे आभार

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखी जाते. मालिका, चित्रपट यांमधून आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणारी प्राजक्ता एक उत्तम सूत्रसंचालक देखील आहे. आपल्या सौंदर्याने आणि फिटनेसने नेहमीच ती सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधत असते. प्राजक्ताचा अष्टांगयोगा तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. सोशल मेडियावरही प्राजक्ताचा कमालीचा वावर असतो. आपल्या फोटो आणि विविध व्हिडिओंसोबतच ती नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर आपले मत मांडत असते. सध्या प्राजक्ता माळी सोशल मीडिया, मनोरंजनविश्व, राजकारण आदी सर्वच क्षेत्रांमध्ये खूपच गाजत आहे. नुकताच प्राजक्तला महाराष्ट्राचे राज्यपाल असणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘कमला रायझिंग स्टार’चा पुरस्कार मिळाला आहे. या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ताने तिला पुरस्कार मिळत असतानाचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ““आणि कालच्या शुभमुहूर्तावर “मुंबई- राजभवनात” जाण्याचा योग आला…काल महाराष्ट्राचे राज्यपाल – मा. श्री. भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते “Kamala Rising Star” पुरस्कार मिळाला..मनापासून धन्यवाद, आयोजन समिती व मा. राज्यपाल.
अमित त्रिवेदी, प्रतिक गांधी,शेफ रणवीर ब्रार, बिझनेस वूमन अनन्या बिर्ला, आकाश ठोसर इ. माझ्या काही आवडत्या व्यक्तींसह हा पुरस्कार मिळाला ह्याचा विशेष आनंद..प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन अशा पुरस्कारांमध्ये होतं असं मला वाटतं, त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार. असच प्रेम राहू द्या. (आई आणि भाऊ या सोहळ्यासाठी खास पुण्याहून आले होते, फोटो काढायचा राहिला, आईने आकाश बरोबर आवर्जून काढला.. चालायचं).” यासोबतच तिने #कृतज्ञ #महाराष्ट्र #सह्याद्रिचीलेक” आदी हॅशटॅग देखील दिले आहेत.

प्राजक्ताने टेलिव्हिजनविश्वात ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचे सूत्रसंचालन करत असून, यासाठी तिचे खूपच कौतुक होत आहे, शिवाय तिचे सूत्रसंचालन देखील प्रेक्षकांना आवडत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा