Sunday, June 22, 2025
Home मराठी प्राजक्ता माळी झाली ‘या’ नवीन संघटनेची सदस्य, सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करत दिली माहिती

प्राजक्ता माळी झाली ‘या’ नवीन संघटनेची सदस्य, सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करत दिली माहिती

आज व्हॅलेंटाइन डे. आजच्या दिवशी आपल्या मनातील खास भावना खास व्यक्तीला सांगत आपले प्रेम व्यक्त करण्याचा सुंदर दिवस. यासोबतच प्रेम करणाऱ्या लोकांचा दिवस. आजचा दिवस नक्कीच दोन खास व्यक्तींसाठी असतो. अनेक प्रेमवीर हा दिवस एकत्र घालवत विविध आठवणी तयार करतात. मात्र असे असले तरी जगात अनेक अशा व्यक्ती आहेत ज्या कोणत्याही नात्यात नसतात. त्या एकट्या असतात मग अशा लोकांनी काय करायचे. आज दिवस साजरा नाही करायचा का? मनोरंजनविश्वात देखील असे बरेच कलाकार आहेत, जे एकटे आहेत. त्यांना अजून त्यांच्या जीवनाचा जोडीदार मिळालेला नाही. अशीच एक मराठीमधील अग्रगण्य अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

हो अनेकदा प्राजक्ताला तिच्या लग्नाबद्दल तिच्या रिलेशनशिपबद्दल विचारले जाते. मात्र नेहमीच तिने तिच्या आयुष्यात असे कोणी नसल्याचे सांगितले आहे. आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले असून, सोबतच एक मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही स्वतःचेच व्हॅलेंटाइन व्हा. हाच झोन पुढे सुरू राहील. अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य तुम्ही एकटे नाही मीही तुमच्यामध्ये सहभागी आहे. या स्वातंत्र्यावर मी प्रेम करते. प्रेम करा, प्रेम पसरवा कारण प्रेम ही एकच अशी गोष्ट आहे, जिच्यावर विश्वास ठेवता येतो.”

प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “धन्यवाद! आमच्या सिंगलपणाच्या दुःखात कुणीतरी सुंदर दिसणारं सामील झाल्याबद्दल… by the way व्हॅलेंटाइन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जाम भारी दिसताय!” एकाने लिहिले, “तू सुंदर असूनही सिंगल कशी?’ अजून एकाने लिहिले, “तुमचं आमच्या संघटनेत सहर्ष स्वागत”.

तत्पूर्वी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्राजक्ता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत असून, मागच्याच महिन्यात तिने तिचा ‘प्राजक्तराज’ हा दागिन्यांचा ब्रँड चालू केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुकेशचे उफाळून आले जॅकलिनवरील प्रेम, कोर्टरूममधून पाठवला प्रेमळ संदेश

व्हॅलेंटाईन डे स्पेशल…पाहा बॉलिवूड कलाकारांनी आपल्या जोडीदारापुढे कशाप्रकारे व्यक्त केलं आपलं प्रेम

हे देखील वाचा