Wednesday, March 29, 2023

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुकेशचे उफाळून आले जॅकलिनवरील प्रेम, कोर्टरूममधून पाठवला प्रेमळ संदेश

सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या नात्यातील सत्य कोणापासूनच लपलेले नाही. दोघांची वैयक्तिक फाेटाे असोत किंवा नोरा आणि जॅकलीन यांच्यातील भांडणात प्रेयसीची बाजू घेणे असो, सुकेशने अनेकदा अभिनेत्रीवर आपले प्रेम व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाइन डेची संधी आहे आणि सुकेशला जॅकलीनची आठवण येत नाही…. असे कसे होऊ शकते. आज या प्रेमदिनानिमित्त सुकेशने कोर्टरूममधून अभिनेत्रीला एक प्रेमळ संदेश पाठवला आहे. हे आम्ही नाही तर काही नवीन अहवालनुसार समोर आले आहेत.

खरे तर, आज म्हणजेच मंगळवारी (दि. 14 फेब्रुवारीला) कोर्टात हजेरी सुरू असताना मीडियावाल्यांनी सुकेश चंद्रशेखर यांची चौकशी केली तेव्हा सुकेशने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जॅकलिनसाठी एक खास मॅसेज दिला. माध्यमातील वृत्तांनुसार, मीडियाने सुकेशला विचारले की, ‘जॅकलिनने लावलेल्या आरोपांवर त्याला काय म्हणायचे आहे?’ प्रत्युत्तरादाखल सुकेश जॅकलिनसाठी मेसेज देत म्हणाला, ‘मला तिच्याबद्दल काहीही बोलायला आवडणार नाही. तिच्याकडे माझ्याविरुद्ध बाेलण्याची अनेक कारणे आहेत, पण मला तिच्याबदद्ल काहीही बोलायचे नाही.’

यानंतर मीडियाने सुकेशला जॅकलिन आणि त्यांच्या नात्याबद्दल काही सांगायचे आहे का?, असे विचारले. यावर सुकेश म्हणाला, ‘तिला माझ्याकडून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा सांगा.’ विशेष म्हणजे या दोघांचे नाते बरेच वादग्रस्त राहिले आहे. जॅकलिन आणि सुकेशचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या अंगावर लव्ह बाइट्स दिसत होते. सुकेश आणि जॅकलीनच्या नात्याचे वास्तव समोर आल्यापासून अभिनेत्रीच्या आयुष्यात रोज नवनवीन वादळे येत आहेत.    अशात आता सुकेशच्या या शुभेच्छांवर जॅकलीन कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे रंजक असणार आहे.

अलीकडेच जॅकलीनचा सुकेशबद्दल मीडियासमोर राग अणावर झाला हाेता. कोर्टातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीने सुकेशविषयी खूप विष उकलले हाेते. सुकेशने माझ्या भावनांशी खेळून माझे आयुष्य नरक बनवले आहे, असे जॅकलिन म्हणाली होती. सुकेश चंद्रशेखर सध्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात आहेत. (sukesh chandrashekhar sent wishes bollywood actress jacqueline fernandez for valentines day from court claims reports)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
व्हॅलेंटाईन डे स्पेशल…लग्नाला नाही म्हणाऱ्या देवेंद्रजींना अमृतांमध्ये ‘काजोल’चा भास होताच नकार बदलला होकारामध्ये
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले आर्चीचे सौंदर्य; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘याड लागलं’

हे देखील वाचा