Thursday, April 18, 2024

मराठमोळ्या ‘या’ अभिनेत्रीने घातले 108 वेळा सुर्यनमस्कार; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मराठी मनोरंजनविश्वातील सुंदर अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी होय. ती एक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच एक उत्तम कवियत्री, उत्तम डान्सर, फिटनेस प्रेमी आहे. खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असलेली प्राजक्ता सतत या ना त्या कारणांमुळे मीडियावर चर्चेत येते. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड लाँच केला आहे. या ब्रँडचे नाव आहे ‘प्राजक्तराज’ असे आहे. प्राजक्ताचे सतत चर्चेत राहण्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्ट. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाव सक्रिय असते.

प्राजक्ता (Prajakta Mali ) तिचे विविध वेशभूषेतील फोटो पोस्ट करत चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. प्राजक्ताच्या पोस्टवर तिचे चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. 21 जूनला सर्वत्र योगा दिन साजरा केला जातो. योगा दिनाच निमित्त साधून प्राजक्ताने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

प्राजक्ताला योगा करायसला खूप आवडतो. तिच्या दिवसाची सुरुवात ती व्यायामाने करत असते. त्यामध्ये ती सुर्यनमस्कारचाही समावेश करते. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्राजक्ताने एक चांगला उपक्रम पुर्ण केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. प्राजक्ताने एकाचवेळी 108 सुर्यनमस्कार केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

व्हिडिओ शेअर करताना प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी सालाप्रमाणेच यंदाही 108 सुर्यनमस्कार घातले आहेत. हा त्याचा पुरावा बघा. योगदिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा दिल्या नाही”. प्राजक्ताच्या या व्हिडिओवर चाहते खूप साऱ्या कमेंट करत आहेत.एका युजरने कमेंट करताना लिहिले की,’अभिनंदन प्राजक्ता जी 108 सूर्यनमस्कार घातल्याबद्दल.’ दुसऱ्याने तर फार मजेशीर कमेंट केली आहे. त्याने लिहिले की,’उठा उठा सकाळ झाली प्राजु सोबत सूर्यनमस्कार करायची वेळ झाली’ प्राजक्ताच्या या व्हिडिओने चाहत्यांच लक्ष वेधून घेतल आहे.

अधिक वाचा- 
पेढे वाटा पेढे! ‘ही’ टीव्ही अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सचिन-सुप्रियाच्या लेकीचा हॉट अंदाज, श्रेयाने केले खास फोटोशूट 

हे देखील वाचा