Thursday, April 18, 2024

पेढे वाटा पेढे! ‘ही’ टीव्ही अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम त्यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू केली आहे. अभिनेत्री दीपितका कक्करने एका लहान गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे चाहते आनंदाने उड्या मारत आहेत. दीपिका आणि शोएब इब्राहिम सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतात. ते त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकतीच आता त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

ते दोघे इंस्टाग्राम व्यतिरिक्त यूट्यूबवरही स्वतःचा ब्लॉग देखील चालवतात. या ब्लॉगमध्ये ते आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अपडेट्स चाहत्यांना देत असतात. शोएब इब्राहिमने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. शोएबने चाहत्यांना काळजी करू नका असे सांगितले आहे. शोएबने दिलेली ही बातमी ऐकून चाहत्याना खूप आनंद झाला आहे. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचीच चर्चा सुरू आहे.

शोएब इब्राहिम म्हणाला की, दीपिका आणि (Deepika Kakar ) त्यांचा छोटा राजकुमार पुर्णपणे निरोगी आहेत. तसेच त्याने चाहत्यांचे आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. आता दीपिका आणि शोएबचे चाहते त्या दोघांचे अभिनंदन करत आहेत. गरोदरपणात ही दीपिका आणि शोएब सोशल मीडियावर सक्रिय होते. शोएबने दीपिकाचे खूप लाड केले आणि ‘दीपिका की दुनिया’ यूट्यूब ब्लाॅगद्वारे, अभिनेत्रीने तिचे आरोग्य आणि गर्भधारणा संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांसह शेअर केल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@ms.dipika)

 दीपिकाने तिच्या ब्लाॅगवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांना सांगितले होते की, डॉक्टरांनी तिला जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्याची तारीख दिली होती. परंतु 21 जून रोजी दीपिकाने बाळाला जन्म दिला आहे. दीपिका आणि शोएबने या वर्षी जानेवारीमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. शोएबने एका फोटोशूटद्वारे चाहत्यांना सांगितले होते की, ते लवकरच पालक होणार आहे. (‘Saath Nibhana Saathiya’ fame tv actress dipika kakar and shoaib ibrahim become parent welcome a baby boy )

अधिक वाचा- 
सचिन-सुप्रियाच्या लेकीचा हॉट अंदाज, श्रेयाने केले खास फोटोशूट
बाॅलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत योगो करण्यात एक्यपर्ट; तुम्हीही या टिप्स फॉलो करा

हे देखील वाचा