Sunday, June 22, 2025
Home मराठी कुणासाठी ‘स्टनिंग’, तर कुणासाठी ‘एव्हरग्रीन’ आहे प्राजक्ता, लेटेस्ट फोटोंवर कमेंट्सचा नुसता महापूर

कुणासाठी ‘स्टनिंग’, तर कुणासाठी ‘एव्हरग्रीन’ आहे प्राजक्ता, लेटेस्ट फोटोंवर कमेंट्सचा नुसता महापूर

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. प्राजक्ताने आधी टीव्ही मालिका, सिनेमे आणि नंतर वेबसीरिजमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवून दिला आहे. प्राजक्ता ही सध्या खूपच चर्चेत आहे. कारण, नुकतेच तिने एका वेबसीरिजमध्ये काम केले होते. यामध्ये ती आतापर्यंत साकारलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा वेगळ्या भूमिकेत होती. विशेष म्हणजे, तिच्या भूमिकेचे कौतुकही करण्यात आले होते.

प्राजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या सिनेमांव्यतिरिक्त सोशल मीडियावरील पोस्टमुळेही चांगलीच चर्चेत असते. प्राजक्ताचा सोशल मीडियावर चांगला वावर असतो. तिला इंस्टाग्रामवर १.८ मिलियन म्हणजेच १८ लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. तिने कोणतीही पोस्ट शेअर केली की, त्यावर चाहते तुटून पडतात आणि लाईक्स तसेच कमेंट्सचा वर्षाव करतात. आताही ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

प्राजक्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ३ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने काळ्या रंगाच्या साडीतील मोहक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यातील दोन फोटोत ती बेडवर झोपलेली दिसत आहे, तर तिसऱ्या फोटोत ती बसलेली दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करत “वसंतसेना,” असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोला आतापर्यंत २० हजारहून अधिक लाईक्स आणि शंभराहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. या फोटोवर चांगल्या-वाईट कमेंट्स आल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “मरतो काय आता मी.” दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिले की, “निखळ सौंदर्य.” आणखी एका युजरने कमेंट केली की, “काय गोड दिसतेय प्राजू..! घायाळ केलंस.” याव्यतिरिक्त काही चाहत्यांना प्राजक्ताची ही स्टाईल आवडली नाहीये. एकाने कमेंट करत लिहिले की, “प्राजक्ता लय होतंय आता तुझं.” असे असले, तरीही यामध्ये सर्वाधिक सकारात्मक कमेंट्सचा समावेश आहे.

प्राजक्ताच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तिने ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ अशा मालिकेत काम केले आहे. तसेच, ‘खो-खो’, ‘हंपी’, ‘रणांगण’, ‘पावनखिंड’, ‘लॉकडाऊन’, ‘चंद्रमुखी’ अशा सिनेमात काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘जिवाची होतीया काहिली’च्या शूटिंगला महाराष्ट्रात नाही, तर ‘या’ ठिकाणी सुरुवात, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

वारीनिमित्त विठुरायाचं नवीन गाणं रिलीझ, घडवले डोळ्यांचं पारणं फिटवणाऱ्या रम्य सोहळ्याचे दर्शन

धनश्री काडगावकरने जिंकली कोल्हापूरकरांची मनं; म्हणाली, ‘इथं आलं की…

हे देखील वाचा