Sunday, June 22, 2025
Home मराठी ‘असो…आज ३ तारीख’, प्राजक्ता माळीला तिच्या ‘त्या’ पोस्टने आणले अडचणीत, कायदेशीर कारवाईची होते मागणी

‘असो…आज ३ तारीख’, प्राजक्ता माळीला तिच्या ‘त्या’ पोस्टने आणले अडचणीत, कायदेशीर कारवाईची होते मागणी

अनेक कलाकार नेहमीच समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर, विविध मुद्द्यांवर त्यांचे मतं मांडताना दिसतात. याला मराठीमधील कलाकार देखील अपवाद नाही. मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार सोशल मीडियावर सतत त्यांची वेगवेगळ्या विषयांवरील मतं मांडताना दिसतात. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असलेली प्राजक्ता माळी देखील याला अपवाद नाही. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. ती सतत सोशल मीडियावरील पोस्टमुळे फॅन्सच्या संपर्कात तर असतेच सोबतच यातून तिला मोठ्या प्रमाणावर लाईमलाइट देखील मिळते.

आज संपूर्ण देशात अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण उत्साहात साजरे केले जात आहेत. कलाकार देखील सोशल मीडियावर पोस्ट टाकून देहसातील जनतेला या सणांच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही तिच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना अक्षय्य तृतीयेच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. मात्र याच शुभेच्छांमुळे प्राजक्ता आता चांगलीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे प्राजक्ताने शुभेच्छा देताना शेअर केलेले फोटो आणि तिची पोस्ट. प्राजक्ताने दोन फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये प्राजक्ता सोन्याच्या हेव्ही दागिन्यांमध्ये बसलेली दिसत आहे तर दुसरा फोटो हा एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा आहे.

प्राजक्ताने या फोटोंसोबत लिहिले की, “सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईद च्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.) असो…आज ३ तारीख…” बस प्राजक्ताच्या पोस्टमधील शेवटचे हे शब्द आणि तिने शेअर केलेला दुसरा फोटोच तिला चर्चेत आणत आहे. सध्या आपल्या देशात मशिदींवरील भोंगे हा मुद्दा खूपच गाजताना दिसत आहे. आणि त्याच अनुषंगाने प्राजक्ताने शेअर केलेले वृत्तपत्राचे कात्रण ज्यात मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे हटवण्याची बातमी आहे.

मात्र प्राजक्ताची मूळ पोस्ट काही वेगळीच होती. तिने ती पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच डिलीट देखील केली. प्राजक्ताने तिच्या मूळ पोस्टमध्ये म्हटले होते की, “असो…आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे (Raj Thackeray) सगळ्याचसाठी…परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद”,

आता प्राजक्ताच्या या पोस्टवरून एक नवीन वाद निर्माण झाला असून अनेक लोकांनी प्राजक्तावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच तिचा महाराष्टरची हास्यजत्रा कार्यक्रमातून काढले जावे अशीही मागणी केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा