नुकताच पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा हा असा ऋतू आहे, जो सर्वांनाच आवडतो. रिमझिम पाऊस सुरू होताच, वातावरण नयनरम्य बनते. विशेष म्हणजे निसर्गाचे खरे सौंदर्य हे आपल्याला पावसाळ्यातच पाहायला मिळते ओलावलेली माती, भिजलेली झाड, गार वारा आणि अंगावर पडणारे पावसाचे थेंब सर्व अगदी मंत्रमुग्ध करणारं असतं.
सिनेसृष्टीतल्या कलाकारांना देखील हा ऋतू प्रिय आहे. सर्व सामान्यांप्रमाणे ते देखील पावसाळ्याचा आनंद लुटताना दिसत आहे. याची झलक आपल्याला सोशल मीडियावर सहज पाहायला मिळेल. आता मराठमोळी प्राजक्ता माळी देखील पावसाच्या वातावरणाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. यासंबंधित एक व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ती चक्क चिखलात चालताना दिसली आहे.
प्राजक्ता माळी ही खासकरून तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग असणारी अभिनेत्री, फोटोशूट्सने तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. मात्र आता पावसाच्या निमित्ताने तिची वेगळी बाजू चाहत्यांच्या समोर आली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्राजक्ता चिखलातून चालत जात आहे. यात तिचे पाय पूर्णतः चिखलाने माखलेले दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये ‘मन चिंब पावसाळी’ हे गाणे वाजत आहे. तसेच प्राजक्ताने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये “चिखलाचा उपचार. पाऊस, निसर्ग आणि मी.” असं लिहिलं आहे. अभिनेत्री कशाप्रकारे या पावसाळ्या ऋतूचा आनंद घेत आहे, हे या व्हिडिओ आपण सहज पाहू शकतो. चाहत्यांना देखील प्राजक्ताचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. यामुळेच व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…