Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड ‘तुझ्यातला दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला…’ प्राजक्ता माळीने आजीआजोबांसोबत पहिला सरसेनापती हंबीरराव

‘तुझ्यातला दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला…’ प्राजक्ता माळीने आजीआजोबांसोबत पहिला सरसेनापती हंबीरराव

सध्या मराठीमध्ये अनेक सिनेमे रेकॉर्डब्रेक कमाई करत तुफान वाहवा मिळवत आहे. चंद्रमुखी, धर्मवीर यांच्यानंतर आता ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा बक्कळ कमाई करत कौतुक मिळवत आहे. प्रवीण तरडे यांच्या या सिनेमाने लोकांच्या मनाला साद घातली आहे. कलाकारांसोबतच प्रेक्षकही सिनेमाचे कौतुक करताना थकत नसल्याचे दिसून येत आहे. कलाकारांचा जबरदस्त अभिनय, दमदार कथा, उत्तम दिग्दर्शन आदी सर्वच जमेच्या बाजू असल्याने हा सिनेमा उत्तम बनला आहे. नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळीने हा सिनेमा तिच्या आजी आजोबांसोबत पहिला. सिनेमा पाहिल्यानंतर तिने तिचा अनुभव सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत व्यक्त केला आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून, ती सतत वेगवेगळ्या पोस्ट शेअर लाइमलाइटमध्ये असते. आता प्राजक्ताने सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा पाहिल्यानंतर तिचा अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच तिने तिचा तिच्या आजी आजोबांसोबतचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. प्राजक्ताने लिहिले, “A day with “आजी-आजोबा” आणि आम्ही “सरसेनापती हंबीरराव” पाहिला. कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट. प्रविण दादा @pravinvitthaltarde तू भारी आहेस- विषय कट. २.३० तासात तू दोन महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट; ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही. तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला.. आणि त्यानी आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? #केवळप्रेम प्रत्येक मराठी माणसानं बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट. (मी पुन्हा किमान दोनदा तरी पाहणार आहे..) आजी- आजोबा एकदम खूष.” या पोस्टसोबत तिने #अटकेपारझेंडा #स्वराज्याचेमावळे #सह्याद्रिचीलेक # आदी हॅशटॅग देखील दिले आहेत.

प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून, त्यावर कलाकार देखील त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. सध्या प्राजक्ता तिच्या ‘रानबाजार’ या सिरीजमुळे कमालीची चर्चेत आली आहे. या सिरीजमध्ये तिने दिलेल्या बोल्ड सीन्समुळे प्राजक्ताला जास्तच लाइमलाइट मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा